शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
3
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
4
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
5
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
6
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
7
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
8
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
9
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
10
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
11
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
12
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
13
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
14
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
15
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
16
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
17
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
18
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
19
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात
20
वडील, भावाचा अकाली मृत्यू, तर बहिणीला कॅन्सर, पण जिद्द सोडली नाही, आकाशदीपच्या संघर्षाची भावूक कहाणी

नागलोन खुल्या कोळसा खाणीमुळे माजरीकरांचा जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 23:06 IST

वेकोलि माजरीच्या नागलोन खुल्या कोळसा खदान हे माजरी वॉर्ड नं. १ व दफाई नं. १ ला लागून आहे. वेकोलि कोळसा उत्पादनाकरिता कंपनीने मातीचे ढिगारे उभारले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडचण निर्माण झाली आहे. हे पाणी साचून राहत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

ठळक मुद्देमाजरी कोळसा खाण : अधिकाऱ्यांचे आश्वासन ठरले फोल

लोकमत न्यूज नेटवर्कमाजरी : वेकोलि माजरीच्या नागलोन खुल्या कोळसा खदान हे माजरी वॉर्ड नं. १ व दफाई नं. १ ला लागून आहे. वेकोलि कोळसा उत्पादनाकरिता कंपनीने मातीचे ढिगारे उभारले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडचण निर्माण झाली आहे. हे पाणी साचून राहत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यातच ब्लॉस्टिंगमुळे घरांनाही भेगा पडत असल्याने घरे कोसळण्याच्या मार्गावर आहेत. मात्र याकडे संबंधित विभागाच्या अधिकाºयांचे दुर्लक्ष होत असल्याने या परिसरातील समस्यांवर कायस्वरुपी तोडगा काढण्याची मागणी जि. प. सदस्य प्रवीण सुरु यांनी निवेदनातून केली आहे.वेकोलि नागलोन खुल्या कोळसा खाणीमध्ये कोळसा उत्पादनाकरिता मोठ्या तिव्रतेची ब्लास्टिंग करण्यात येत असते. या ब्लास्टिंगमुळे अनेकांची घरे कोसळली आहेत.अनेकांच्या घराच्या भिंतीला भेगा पडल्या आहेत. या अतितिव्र ब्लास्टिंगमुळे घराच्या भिंती कोसळल्याने जीवित हानी होण्याची शक्यता आहे. तर कोळशाच्या धुळीने दफाई नंबर एकमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. तर मातीच्या ढिगाºयामुळे पाणी साचून राहल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.याबाबतची तक्रार परिसरातील नागरिकांनी वेकोलि माजरीचे अधिकारी तसेच तहसिलदाराकडे निवेदनातून केली. दरम्यान, वेकोलि अधिकारी व तहसिलदारांनी मौका चौकशी करून नुकसान भरपाई व घराचे दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले. मात्र आजतगाजत या लोकांना कुठल्याच प्रकारची मदत मिळाली नाही. त्यामुळे माजरी जि. प. पाटाळाचे सदस्य प्रवीण सुर यांनी वेकोलि प्रशासन व तहसीलदार, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, जिल्हाधिकारी व वेकोलि नागपूरचे खाण निर्देशक यांना निवेदनातून कायमस्वरुपी तोडगा काढण्याची मागणी केली. अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी निवेदनातून दिला आहे.