शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

नागभीड तालुक्यातील नैसर्गिक जलसाठे आटले

By admin | Updated: June 16, 2016 01:41 IST

नागभीड तालुक्यात जंगलाचे प्रमाण अधिक आहे. सोबतच वन्यप्राण्यांचे प्रमाणसुद्धा लक्षणीय आहे.

शासनाने लक्ष द्यावे : वन्यप्राण्यांची भटकंतीचिंधीचक : नागभीड तालुक्यात जंगलाचे प्रमाण अधिक आहे. सोबतच वन्यप्राण्यांचे प्रमाणसुद्धा लक्षणीय आहे. परंतु प्रत्येक उन्हाळा त्यांच्या जीवावर बेतणारा असतो. आताही जंगलातील जलसाठे आटण्याच्या स्थितीत आहेत.ग्रामीण भागातील जनतेच्या अज्ञानामुळे व थोड्या स्वार्थासाठी जंगलात वनवा लावतात. त्यामुळे जे नैसर्गिक जंगल असते, ते आपोआप नष्ट होत जाते. तसेच आगीमुळे औषधी वनस्पती, उपजाऊ झाडे नष्ट होत असतात. गवत व झुडपी वनामध्ये वास्तव्य करणारे पक्षी, सरपटणारे प्राणी, शेतकऱ्यांना हितकारक असणारे किटक यांचा नाश होत असतो. आगीत हे प्राणी होरपळून गतप्राण होत असतात. सुर्य आग ओकत असल्याने नैसर्गिक जलसाठे आटत आहेत. या कारणामुळे वन्यप्राणी पाण्याअभावी तडपडून मृत्यूमुखी पडत आहेत. काही प्राणी तृष्णा भागविण्यासाठी गावाकडे मोर्चा वळविताना दिसत आहे. परिणामत: त्यांना गावठी कुत्र्याच्या आणि मानवी वक्रदृष्टीला बळी पडावे लागत आहे.सध्या परिसरातील जंगलामध्ये एखाददुसऱ्या ठिकाणीच पाणी उपलब्ध आहे. परंतु त्याठिकाणीसुद्धा शिकारी टपून असतात. त्यामुळे वन्यप्राण्यांचा जीव धोक्यात आला आहे. शासन मानवाला पाणी मिळावे ेम्हणून सतत धडपड करीत असते. पण नैसर्गिक साखळीतील महत्त्वाचा घटक असलेल्या वन्यजीवासाठी शासन गंभीर असल्याचे दिसून येत नाही. काही वेळा शासन निधीची तरतूद करते. मात्र वनाधिकाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे योजना कार्यान्वित झालेल्या दिसत नाही. वन विभागाने जंगलात कृत्रिम पाणवठ्याची सोय करायला पाहिजे. यामुळे वन्यप्राणी इतरत्र भटकणार नाही व त्यांचा जीवही धोक्यात येणार नाही. (वार्ताहर)