शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

नागभीडचा पाणी पुरवठा चार दिवसांपासून बंद

By admin | Updated: June 18, 2016 00:34 IST

तपाळ पाणी पुरवठा योजनेत तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने नागभीडला होणारा पाणी पुरवठा गेल्या चार दिवसांपासून बंद आहे.

तपाळ योजना : तांत्रिक बिघाडनागभीड : तपाळ पाणी पुरवठा योजनेत तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने नागभीडला होणारा पाणी पुरवठा गेल्या चार दिवसांपासून बंद आहे. परिणामी पाण्याविना नागभीडकरांचे चांगलेच हाल सुरु आहेत.तपाळ या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेद्वारे नागभीड शहराला पाण्याचा पुरवठा केला जाते. ही योजना नागभीडपासून ३० किमी अंतरावर असल्याने अनेक संकटाशी सामना करीत नागभीडला पाणीपुरवठा होत होता. तरीही नागभीड येथील सदोष नळ योजनेच्या रचनेमुळे अनेक ठिकाणी पाणीच येत नव्हते. आता तर गेल्या चार दिवसांपासून पाण्याचा पुरवठाच बंद आहे.केवळ नागभीडच नाही तर या योजनेत समाविष्ट असलेल्या नवखळा, चिखलपरसोडी, चिकमारा, ढोरपा, मौशी, ईरव्हा, टेकरी, देवटेक, बाळापूर ही नागभीड तालुक्यातील तर ब्रह्मपुरी तालुक्यातील तोरगाव (खुर्द), तोरगाव (बुज.) या गावांचा या योजनेत समावेश आहे. योजनेच्या उगमस्थळावरच तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने या गावांचा सुद्धा पाणीपुरवठा नागभीडसारखाच गेल्या चार दिवसांपासून बंद आहे. तांत्रिक बिघाडामुळे निर्माण झालेल्या या कृत्रिम पाणी टंचाईची झळ या सर्वच गावातील नागरिकांना बसत आहे. त्यातल्या त्यात नागभीडमध्ये ही झळ सर्वात जास्त जाणवत आहे. नागभीडमध्ये बहुतांश घरी खाजगी विहिरी आणि विंधन विहिरीची व्यवस्था असली तरी पिण्यासाठी मात्र तपाळ योजनेच्या पाण्याचा वापर अधिकांश लोक करीत आहेत. या लोकांची पाण्यासाठी चांगलीच तारांबाळ उडत आहे. नागभीड येथील काही भाग असे आहेत, ते तपाळ योजनेच्या पाण्यावरच अवलंबून आहेत, अशांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. (तालुका प्रतिनिधी)