शहरं
Join us  
Trending Stories
1
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
2
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
3
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
4
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
5
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
6
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
7
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
8
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
9
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
10
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
11
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
12
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
13
आव्हाड घुसले पोलिस कारखाली, ओढून काढावे लागले बाहेर
14
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
15
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
16
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई
17
भारतीय महिला संघ लॉर्ड्स वनडे जिंकण्यास सज्ज; इंग्लंडविरुद्ध दुसरा सामना आज
18
मुंबईची सारा जामसुतकर ठरली ‘चॅम्पियन’
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

मिनी मंत्रालयात नागभीडला उपाध्यक्ष पदाची परंपरा

By admin | Updated: March 5, 2017 00:46 IST

मिनी मंत्रालयात नागभीडचे स्थान महत्त्वाचे राहिले आहे. या तालुक्यातून निवडून गेलेल्या तिघांना आजवर उपाध्यक्षपदाची तर अनेकांना सभापतीपदाची संधी मिळाली आहे.

यंदाही अपेक्षा : जिल्हा परिषदेचे अनेक पदही भूषविलेघनश्याम नवघडे नागभीडमिनी मंत्रालयात नागभीडचे स्थान महत्त्वाचे राहिले आहे. या तालुक्यातून निवडून गेलेल्या तिघांना आजवर उपाध्यक्षपदाची तर अनेकांना सभापतीपदाची संधी मिळाली आहे. हिच परंपरा आताही कायम राहील, अशी आशा नागभीडकर बाळगून आहेत.१९७८ मध्ये संयुक्त चंद्रपूर जिल्ह्यात मौशी सुलेझरी जि.प. गटातून निवडून गेलेले रामचंद्र हरी मोरांडे यांना चंद्रपूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होण्याचा मान मिळाला. काही काळ ते चंद्रपूर जिल्हा परिषदेचे प्रभारी अध्यक्षही होते. १९८२ मध्ये चंद्रपूर जिल्ह्याची फाळणी झाली. नवीन गडचिरोली जिल्हा अस्तित्वात आला. त्यानंतर १९९२ पर्यंत चंद्रपूर जिल्हा परिषदेवर प्रशासकीय कार्यकाळ राहिला. १९९२ मध्ये १० वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर जिल्हा परिषदेची निवडणूक झाली. पाचपैकी चार सदस्य काँग्रेसचे निवडून आले. जिल्हा परिषदेतही काँग्रेसला बहूमत मिळाले पण पदाधिकारी निवडीत मात्र नागभीडवर अन्याय करण्यात आला. मात्र एक वर्षानंतर जिल्हा परिषदेत राजकीय घडामोडी घडल्या आणि मौशी-सुलेझरी या प्रभागातूनच निवडून अलोले अ‍ॅड. दिगंबर पाटील गुरुपुडे यांची उपाध्यक्ष म्हणूनच वर्णी लागली ते १९९७ पर्यंत उपाध्यक्ष तर होतेच. पण काही काळ त्यांनीही प्रभारी अध्यक्ष म्हणून सुत्रे सांभाळली. याच कार्यकाळात तळोधी-गोविंदपूर येथून निवडून आलेले राजेंद्र बिरेवार जिल्हा परिषदेत सभापती होते.१९९७ मध्ये झालेल्या निवडणुकीत अ‍ॅड. गोविंद भेंडारकर मौशी सुलेझरीतूनच काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडून आले. त्यांनाही जिल्हा परिषदेत उपाध्यक्ष म्हणूनच संधी मिळाली. २००२ मध्ये वाढोणा-गिरगावमधून निवडून आलेल्या अशोक गायकवाड यांना सभापती म्हणून संधी मिळाली. २००७ मध्ये मौशी-सुलेझरीतून निवडून आलेल्या प्रफुल्ल खापर्डे यांना तर २०१२ मध्ये नागभीड-कान्पा येथून निवडून आलेल्या ईश्वर मेश्राम यांनी जिल्हा परिषदेत सभापती म्हणून नेतृत्व करण्याची संधी मिळाली.नुकत्याच झालेल्या जि.प. निवडणुकीत चंद्रपूर जिल्हा परिषदेत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. या तालुक्यातून संजय गजपुरे भाजपाकडून निवडून आले आहेत. गेल्या तीस वर्षापासून गजपुरे भाजपाचे काम करीत आहेत. या काळात संघटनात्मक अनेक महत्त्वाची पदे भुषवली आहेत. केंद्रीय मंत्री हंसराज अहीर व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी गजपुरे यांचे संबंध जवळचे असल्याने नागभीड तालुक्याच्या परंपरेला साजेल असे चंद्रपूर जिल्हा परिषदेतील पद गजपुरे यांना मिळेल, अशी आशा आहे.