लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : नागभीड रेल्वे जंक्शनने मंगळवारी खरोखरच प्रवाश्यांची गर्दी अनुभवली. रेल्वेचे दोन्ही प्लाटफार्मवर प्रवाशांची गर्दी ओसंडून वाहत होती. आज बुधवारीदेखील अशीच परिस्थिती होती.यावर्षी दिवाळीला सलग पाच सहा दिवसांच्या सुट्या आल्याने बहुतेक चाकरमानी, कामाधंद्याच्या निमित्ताने बाहेर ठिकाणी असलेले व्यक्ती आणि शाळा महाविद्यालयांनाही सुट्या असल्याने शाळा महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी व त्यांचे शिक्षक दिवाळीसाठी गावी आले होते. आता या सुट्या संपल्यानंतर प्रत्येकालाच आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी जायची घाई आहे. तशी घाई सध्या रेल्वे स्टेशनवर दिसत आहे.इतर प्रवासी साधनांच्या तुलनेत सध्यातरी सर्वात स्वस्त आणि सुरक्षित प्रवास रेल्वेचा आहे. नागभीड येथून नागपूर, चंद्रपूर आणि गोंदियाकडे रेल्वे रवाना होतात. त्यामुळे प्रवाश्यांची संख्या आधीच भरपूर असते. त्यातच मंगळवारी सकाळी १०.३० ला गोंदियाकडून नागभीडला येणारी रेल्वे तब्बल दोन तास उशिरा म्हणजे १२.३० ला आली. चंद्रपूरवरून गोंदियाला जाणारी नियोजित वेळेत आली. तसेच नागभीडवरून नागपूरला दुपारी १२.३० जाणारी गाडीही नियोजित वेळेवरच सुटली. या तिन्ही गाड्यांच्या प्रवाश्यांनी नागभीड रेल्वे स्टेशन एवढे फुलून गेले होते की दोन्ही प्लाटफार्मवर प्रवाशांना पाय ठेवायला जागा उरली नव्हती.यामुळे गाडी उशिराअजुर्नी ( मोरगाव ) - वडेगाव या दरम्यान माल वाहतूक करणारी गाडी नादुरुस्त झाल्याने गोंदियावरून नागभीडमार्गे बल्लारशाकडे जाणारी नियमित गाडी तब्बल दोन तास उशिराने आली. परिणामी वडसा, ब्रम्हपुरी, नागभीड, तळोधी, सिंदेवाही व राजुलीवरून चंद्रपूरकडे प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.गाडीही फुल्लनागभीडवरून चंद्रपूरकडे दुपारी १२.३० ला सुटलेली रेल्वे गाडी प्रवाश्यांनी खचाखच भरली होती. गाडी आधीच हाऊसफुल्ल झाल्याने नागभीडवरून गाडीत चढलेल्या प्रवाशांना उभ्यानेच प्रवास करावा लागला.
नागभीड जंक्शन होतेय हाऊसफुल्ल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 22:15 IST
नागभीड रेल्वे जंक्शनने मंगळवारी खरोखरच प्रवाश्यांची गर्दी अनुभवली. रेल्वेचे दोन्ही प्लाटफार्मवर प्रवाशांची गर्दी ओसंडून वाहत होती. आज बुधवारीदेखील अशीच परिस्थिती होती.
नागभीड जंक्शन होतेय हाऊसफुल्ल
ठळक मुद्देदिवाळीच्या सुट्या संपल्या : नागरिकांचा परतीचा प्रवास सुरू