शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

नगर पंचायतीचे पडघम वाजले

By admin | Updated: May 15, 2014 01:00 IST

राज्य शासनाने लोकसभा निवडणूकीपूर्वी २५ हजार लोकसंख्या असलेले गाव व तालुका मुख्यालय असलेल्या गावामध्ये नगर पंचायत स्थापण करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला होता.

तालुका मुख्यालयाचा दर्जा : नागरिकांकडून मागितले आक्षेपगडचिरोली : राज्य शासनाने लोकसभा निवडणूकीपूर्वी २५ हजार लोकसंख्या असलेले गाव व तालुका मुख्यालय असलेल्या गावामध्ये नगर पंचायत स्थापण करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला होता. या निर्णयानूसार गडचिरोली जिल्ह्यात १0 नगर पंचायत निर्माण होणार होत्या. याशिवाय चामोर्शी व आरमोरी येथे नगर परिषद स्थापन करण्याबाबतची मागणी विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी केली होती. मात्र या संदर्भात नगर पंचायत स्थापण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अहेरी, चामोर्शी व आरमोरी या ३ ग्रामपंचायतीच्या क्षेत्रामध्ये या संदर्भात उद्घोषणा करण्यात आली असून प्रारूप अधिसूचनाही राज्य शासनाच्या उपसचिवाकडून जाहीर करण्यात आली आहे. अहेरी ग्रामपंचायतीला या संदर्भात ९ मे रोजी पत्र प्राप्त झाले असून ग्रामपंचायतीचे नगर पंचायतमध्ये रूपांतर करण्यासाठी नागरिकांकडून आक्षेप ३0 दिवसात मागविण्यात आले आहेत.जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याकडे हे आक्षेप नोंदवावेत, असे आवाहन जनतेला करण्यात आले आहे.गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली व देसाईगंज या दोन नगर पालिका आहेत. आरमोरी व चामोर्शी हे दोन मोठे गाव असून या गावांची लोकसंख्या साधरणत: २५ ते ३५ हजाराच्या घरात आहे. या दोन तालुका मुख्यालयांना नगर पालिकेचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी सातत्याने करण्यात येत आहे.आरमोरी येथील विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी आरमोरी ग्रामपंचायतीचे नगर पालिकेत रूपांतर करावे यासाठी नागपूर हिवाळी अधिवेशनात उपोषणही केले होते. तसेच या संदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेटही घेऊन त्यांच्याकडे मागणी केली होती. मात्र राज्य शासनाकडे सध्या आरमोरी येथे नगर पंचायतकरिता अधिसूचना जारी झाली आहे.त्यामुळे येथील नागरिकांनी याबाबत आक्षेप नोंदविला असून आरमोरीला आत्ताच नगर पालिका म्हणून घोषीत करावे, अशी त्यांची मागणी आहे.गडचिरोली जिल्ह्यात कोरची, कुरखेडा, धानोरा, मुलचेरा, एटापल्ली, सिरोंचा, भामरागड, चामोर्शी, आरमोरी, अहेरी या तालुका मुख्यालयाच्या ग्रामपंचायतींना नगर पंचायतीचा दर्जा मिळणार आहे. यातील आरमोरी व चामोर्शी या दोन गावांतील नागरिकांनी नगर पालिकेचा दर्जा मिळावा, अशी मागणी केली आहे.सध्या तरी शासनाने नगर पंचायतबाबत अधिसूचना जारी केली असून नागरिकांकडून आक्षेपही मागविले आहेत. त्यामुळे शासन नगर पालिका स्थापण्याबाबत काही निर्णय करते काय विषयी जिल्ह्यातील नागरिकांमध्ये अद्याप चर्चाच आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

अहेरी ग्रामपंचायतीचे नगर पंचायतमध्ये रूपांतर करण्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. याबाबत कुणाचेही आक्षेप असल्यास त्यांनी राजपत्रात प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून ३0 दिवसाच्या आत जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याकडे नोंदवावी.- ए.व्ही.उंदिरवाडे, ग्रामविकास अधिकारी, अहेरी