शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

नाफेडतर्फे चणा खरेदीसाठी नोंदणी केंद्र सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 22:32 IST

भारत हा कृषीप्रधान देश आहे. या देशात ७५ टक्के जनता शेती व्यवसायावर अवलंबून आहे. शासनामार्फत शेतमालाला योग्य भाव मिळावा आणि शेतमालाच्या विक्री प्रक्रियेदरम्यान शेतकऱ्यांना नाहक त्रास होऊ नये, यासाठी नाफेड अंतर्गत शेतीमाल खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात ११ तालुक्यात विविध ठिकाणी सुरु करण्यात आले आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील ११ तालुक्यात होणार नोंदणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : भारत हा कृषीप्रधान देश आहे. या देशात ७५ टक्के जनता शेती व्यवसायावर अवलंबून आहे. शासनामार्फत शेतमालाला योग्य भाव मिळावा आणि शेतमालाच्या विक्री प्रक्रियेदरम्यान शेतकऱ्यांना नाहक त्रास होऊ नये, यासाठी नाफेड अंतर्गत शेतीमाल खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात ११ तालुक्यात विविध ठिकाणी सुरु करण्यात आले आहे.संपूर्ण जिल्ह्यातील ११ तालुक्यातील खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना चना खरेदीची नोंदणी करता येणार आहे. ज्या तालुक्यात खरेदी केंद्रे सुरु करण्यात आलेले नाही. अशा तालुक्यातील शेतकऱ्यांना चणा खरेदीची नोंदणी करण्यासाठी काही खरेदी केंद्रनिहाय तालुके जोडण्यात आलेले आहेत. भद्रावती तालुक्यातील शेतकऱ्यांना वरोरा येथील खरेदी केंद्रावर नोंदणी करता येईल. तसेच ब्रम्हपुरी, नागभीड, सिंदेवाही तालुक्यातील शेतकऱ्यांना चिमूर या खरेदी केंद्र्रावर तर चंद्रपूर, गोंडपिंपरी, मूल, पोंभूर्णा, सावली तालुक्यातील शेतकऱ्यांना राजुरा येथील खरेदी केंद्रावर त्याचबरोबर कोरपना आणि जिवती या तालुक्यातील शेतकऱ्यांना गडचांदूर या खरेदी केंद्रावर चणा खरेदी नोंदणी करता येणार आहे. सदर खरेदी केंद्रावर इतर तालुक्यातील शेतकऱ्यांनी नोदणी करण्यासाठी आपले आधार कार्ड, शेतीचा सातबारा, बँक खाते पासबुकसह केंद्रावर जावून नोंदणी करावी.