शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

शाश्वत स्वच्छतेसाठी ‘माझं गावच माझं तीर्थ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 22:27 IST

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शाश्वत स्वच्छतेकरिता अभिनव उपक्रम म्हणून ‘माझं गावच माझ तिर्थ’ स्पर्धा चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक गावासाठी राबविली जात आहे. या स्पर्धेतून गावाला विकासाकडे नेण्यासाठी हा अभिनव उपक्रम जिल्ह्यातील प्रत्येक गावात राबवा, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

ठळक मुद्देप्रत्येक गाव होणार सहभागी : जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शाश्वत स्वच्छतेकरिता अभिनव उपक्रम म्हणून ‘माझं गावच माझ तिर्थ’ स्पर्धा चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक गावासाठी राबविली जात आहे. या स्पर्धेतून गावाला विकासाकडे नेण्यासाठी हा अभिनव उपक्रम जिल्ह्यातील प्रत्येक गावात राबवा, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.जिल्ह्यातील गावागावात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची संकल्पना दृढ व्हावी व जिल्ह्यातील प्रत्येक ग्राम शाश्वत स्वच्छ राहावे, या दृष्टीने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध उपक्रम राबविल्या जात आहे. माझं गावच माझं तिर्थ नामक हा उपक्रम मोठ्या स्वरुपात राबविणारा चंद्रपूर राज्यातील एकमेव जिल्हा ठरणार आहे. या स्पर्धेची सुरुवात चंद्रपूर तालुक्यातील प्रसिध्द तिर्थक्षेत्र वढा येथून केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर व जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व गावात शाश्वत स्वच्छतेकरिता श्रमदान, लोकसहभागाची चालना देण्याचे काम केले जात आहे. या स्पर्धेत लोकसहभावर भर देण्यात आला असून स्पर्धेत तालुकास्तर व जिल्हा स्तरावर भरघोष बक्षीस स्पर्धेत उत्कृष्ठ काम करणाऱ्या गावाला दिले जाणार आहे.१६ नोव्हेंबर २०१८ पासून जिल्ह्यात स्पर्धेला सुरुवात झाली असून स्पर्धेच्या तपासणीकरिता तालुका पातळीवर गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तपासणी समिती व जिल्हास्तरीय तपासणीकरिता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आलेली आहे. तालुकास्तरीय तपासणी १ जानेवारी २०१९ ते १० जानेवारी २०१९ या कालावधीत तर जिल्हास्तरीय तपासणी १५ जानेवारी २०१९ ते २५ जानेवारी २०१९ या कालावधीत होणार आहे. गाव तपासणी करताना तपासणी चमू नादुरुस्त शौचालय दुरुस्ती व वापर, वाढीव कुटुंबाकडे शौचालय उपलब्धता व वापर, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाबाबत केलेल्या उपाययोजना, शोषखड्डे, प्लॅस्टिक निर्मुलन, विद्यार्थ्यांमध्ये जागृती, सार्वजनिक स्थळांची स्वच्छता व गावात शाश्वत स्वच्छता राखण्याच्या दृष्टीने गावकºयांनी लोकसहभागातून राबविलेले नाविन्यपूर्ण उपक्रम याबाबींवर भर दिला जाणार आहे.जिल्ह्यातील गावे या स्पर्धेत मोठ्या प्रमाणावर सहभागी होत असून शाश्वत स्वच्छतेचे वातावरण निर्माण होण्यासाठी ग्रामस्थ सहभागी होऊन प्रयत्न करीत आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय यंत्रणा व तालुकास्तरीय यत्रंणा स्पर्धेची माहिती गावागावात देत आहेत.अशी आहेत बक्षिसेतालुका स्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय येणाऱ्या ग्रामपंचायतीला अनुक्रमे रुपये २५ हजार, १५ हजार व १० हजार रुपयांचे रोख बक्षीस व सन्मानपत्र तर जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय येणाºया ग्रामपंचायतीला अनुक्रमे एक लाख, ७५ हजार व ५० हजार रुपयांचे रोख बक्षीस व सन्मानपत्र देवून ग्रामपंचायतींना गौरविण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर विशेष बाब म्हणून नाविण्यपूर्ण प्रोत्साहन म्हणून ४० हजार रुपये रोख व सन्मानपत्र या स्वरुपाचे चौथे बक्षीस आहे.‘माझं गावच माझ तिर्थ’ ही एक अभिनव संकल्पना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी मांडली आहे. हीच ग्रामविकासाची संकल्पना जिल्ह्यातील प्रत्येक ग्राम शाश्वत स्वच्छ करुन गावागावात ग्रामस्थांमध्ये रुजायला हवी. यासाठी जिल्ह्यातील ग्रामस्थांनी या स्पर्धेकरिता लोकसहभाग व श्रमदानातून गावाला सज्ज करावे.- जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. चंद्रपूर.