शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड योग्य पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 22:51 IST

जीवनातील गरजा पूर्ण करण्यासह निवृत्तीनंतर आरामदायी आयुष्य जगण्यासाठी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे सर्वात योग्य पर्याय असल्याचे गुंतवणूक इच्छुकदारांनी मान्य केले. म्युच्युअल फंडात आजच गुंतवणूक करण्याचा निर्धारही सर्वांनी केला.

ठळक मुद्देउदंड प्रतिसाद : ‘लोकमत’ आणि आदित्य बिर्ला सनलाईफ म्युच्युअल फंडतर्फे मार्गदर्शन शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जीवनातील गरजा पूर्ण करण्यासह निवृत्तीनंतर आरामदायी आयुष्य जगण्यासाठी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे सर्वात योग्य पर्याय असल्याचे गुंतवणूक इच्छुकदारांनी मान्य केले. म्युच्युअल फंडात आजच गुंतवणूक करण्याचा निर्धारही सर्वांनी केला.प्रसंग होता ‘लोकमत’ आणि आदित्य बिर्ला सनलाईफ म्युच्युअल फंड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘इन्व्हेस्टमेंट मंत्र गुंतवणूकविषयक मार्गदर्शक शिबिराचा. म्युच्युअल फंडाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यास शहरवासीयांमध्ये प्रचंड उत्सुकता असल्याची प्रचिती यानिमित्ताने आली. चंद्रपूर येथील हॉटेल सिद्धार्थ प्रिमियर मध्ये शुक्रवारी दुपारी हे शिबिर पार पडले.कॉलेजच्या विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच जण सहभागी झाले होते. प्रत्येकाच्या मनात आपल्या कमाईतील पैसा सुरक्षित व योग्य ठिकाणी गुंतवण्याची प्रबळ इच्छा होती. ही इच्छा शिबिरात अनेकांनी व्यक्त करून दाखविली. आदित्य बिर्ला सनलाईफ एएमसी लिमिटेडचे रिजनल हेड मनीष शुक्ला यांनी सांगितले की, आपण कमावलेल्या पै पै ची कोणाच्या सांगण्यावर किंवा अर्धवट माहितीवर डोळे झाकून कोठेही गुंतवणूक करू नका. गुंतवणूक करण्यापूर्वी आपण आपल्या जीवनातील गरजा ओळखा. त्यात प्राथमिकतेनुसार त्या गरजांची गटवारी तयार करा. त्यानुसार आर्थिक नियोजन करा.गुंतवणुकीची सुरुवात लवकर करा. जेवढे लवकर तुम्ही गुंतवणूक कराल, तेवढा फायदा तुम्हाला मिळेल. सध्या नोकरीचा काही भरवसा राहिलेला नाही तसेच आता खाजगी क्षेत्रात सोडाच पण सरकारी नोकरीतही निवृत्ती वेतन मिळणार नाही. यामुळे निवृत्तीनंतरच्या आयुष्यात पैशाची टंचाई जाणवू द्यायची नसेल तर म्युच्युअल फंडशिवाय दुसरा सर्वोत्तम पर्याय नाही हे त्यांनी विविध व्हिडीओ क्लीप व उदाहरणांद्वारे उपस्थितांना पटवून दिले. म्युच्युअल फंड म्हणजे काय आहे, मागील २० वर्षांत यात गुंतवणूक करणाऱ्यांना किती लाभ झाला, याची सविस्तर माहिती आदित्य बिर्ला सनलाईफ एएमसी लिमिटेडचे ट्रेनिंग कन्सल्टंट नीलरत्न चौबळ यांनी दिली. त्यांनी सांगितले की, गुंतवणूक करताना तुम्हाला जोखीम घ्यावीच लागेल. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणे हे जोखमीचे आहे, असे स्पष्ट सांगितले जाते हेच यातील पारदर्शकता असल्याचे त्यांनी नमूद केले. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून तुम्ही तुमचे आर्थिक जीवन अधिक समृद्ध करू शकता. शिवाय जोखीमदेखील थोडी कमी होते. याची सविस्तर माहिती त्यांनी दिली. या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या अनेक प्रश्नांचे निराकरणही त्यांनी केले.म्युच्युअल फंडात गुंतवणूक वैविध्यपूर्णम्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक ही अनेक जागी केली जाते. म्हणून गुंतवणूक वैशिष्ट्यपूर्ण असते. त्यामुळे धोका कमी होतो. समजा तुमची पूर्ण गुंतवणूक एकाच प्लॉटमध्ये आहे किंवा एकाच कंपनीच्या शेअरमध्ये आहे. फक्त सोन्यातच आहे. अशा वेळेस किंमती कमी झाल्यास मोठे नुकसान होते.याउलट जर तुमची गुंतवणूक वैविध्यपूर्ण असेल आणि एका गुंतवणुकीवर संकट आले तर तुमचे जास्त नुकसान होणार नाही. झालेले नुकसान दुसरी गुंतवणूक भरूनही काढू शकते. हेच म्युच्युअल फंडचे वैशिष्ट्य असल्याचे मनीष शुक्ला यांनी सांगितले.म्युच्युअल फंडाद्वारे वेळेवर गुंतवणुक करुन दीर्घकाळीन परतावा चांगल यतो. त्यासाठी योग्य ठिकाणी, योग्य योजनेमध्ये पैसे गुंतवणे आवश्यक आहे. निवृत्तीनंरचे आयुष्य सुखकर जाण्यासाठी म्युच्यूअल फंड हा सर्वोत्तम पर्याय आहे.-मनिष शुक्लाम्युच्यूअल फंड म्हणजे नेमके काय हे व्यवस्थीत माहीत करुन घेऊन मगच या योजनेत पैसे गुंतवावे पैसे गुंतवताना किती वर्षात किती लाभ याची माहीती गुंतवणुक दाराने ठेवायला हवी. पैेसे गुंतवून योग्य वेळेवर योग्य लाभ मिळण्याचा सर्वोत्तम पर्याय म्हणजे म्युच्यूअल फंड होय. -निलरत्न चौबल