चंद्रपूर : मुस्लिम हक्क संघर्ष समितीतर्फे आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी मुस्लिम समाजाने आंदोलन केले. चंद्रपूर, वरोरा, भद्रावती, वरोरा, राजुरा आदी तालुक्यात मोठ्या प्रमाणात आंदोलनात समाजबांधव सहभागी झाले. काही ठिकाणी आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर सोडण्यात आले.भाजपा-शिवसेना राज्य सरकारने मराठा आरक्षणाला हिरवा कंदील देत मुस्लिम आरक्षणाला खो दिला. राज्य सरकारच्या विरोधात मुस्लिम हक्क संघर्ष समितीने आंदोलन केले. सरकारपुढे न्या. सच्चर आयोग, रंगनाथ मिश्रा आयोग, डॉ. मेहमुहूर्रहमान समितीचा अहवाल आहे. प्रत्येक अहवालाने मुस्लिम समाज दलित आणि आदिवासीपेक्षाही मागासलेला असल्याचे नमूद करून मुस्लिम समाजाला आरक्षणाची गरज असल्याचे स्पष्टपणे नमूद केलेले आहे. मात्र राज्य सरकार मुस्लिम आरक्षणाबद्दल नकारात्मक भुमिका घेत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री मुस्लिम समाजाची दिशाभूल करून मुस्लिम समाजावर अन्याय करीत आहे. समाजावर अन्याय होत आहे. सरकारचा सबका साथ, सबका विकास हा नारा सार्थक ठरत नसल्यामुळे आता मुस्लिम समाज रस्त्यावर येवून आंदोलन करावे लागत असल्याचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.डॉ. मेहमुदूर्रहमान समितीच्या सिफारशी लागू करून मुस्लिम समाजाला सर्वच क्षेत्रात आरक्षण लागू कराव्या आदी मागण्या यावेळी करण्यात आला. चंद्रपूर येथे मुस्लिम हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष हाजी सैय्यद अनवर अली, समन्वयक सय्यद आबिद अली, समन्वयक मुश्ताक कुरैशी यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम समाज सहभागी झाले.गोंडपिपरीस्थानिक ग्रामपंचायत कार्यालयासमोर शेख रफीक शेख रहमान, अस्लम शेख यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी राजीक कुरेशी, कदीर कुरेशी, आसिफ खॉन, रियाज कुरेशी, युसफ खॉन, मुजफ्फर सैय्यद हारून, अशपाक कुरेशी उपस्थित होते. आंदोलन सुरू होताच पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन घटनास्थळावरच सुटका केली.वरोरातालुका वरोरा मुस्लिम संघर्ष समितीच्या वतीने मुस्लिम समाजाला आरक्षण व इतर मागण्या शासनाने मान्य कराव्यात याकरिता वरोरा शहरातील नागपूर-चंद्रपूर मार्गावरील रत्नमाला चौकात रस्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनाची शासनाने दखल घेतली नाही तर यापुढे आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार तालुका मुस्लिम संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.भद्रावतीचंद्रपूर - नागपूर महामार्गावरील अली पेट्रोल पंपसमोर मुस्लिम आरक्षणासंदर्भात दुपारी १२ वाजता रास्ता रोको केला. राका युवक अध्यक्ष मुनाज शेख, जाकीर शेख, जावेद शेख, शाहीद कुरेशी, जफर अहमद, इजाज अली, मुस्ताक अली, रब्बावी, जावेद जाबीर, इमरान अली, हाजी शाहेद, हाजी जावेद शेख आदी मुस्लिम बांधव उपस्थित होते.राजुराचंद्रपूर जिल्हा मुस्लिम हक्क समितीचे जिल्हा सचिव सय्यद सखावत अली यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात सय्यद शहेजाद अली, फारूख शेख, बाबा बेग, एजाज अहमद, शब्बीर पठाण, असद कुरेशी, शेख जमीर, शेख ताजुद्दीन, इमरान शेख, ललु शेख, मतीन कुरेशी, शहनवाज कुरेशी, सय्यद साबीर, जावेद शेख, उबेद कुरेशी, नौशाद हुसेन, असीम बियावानी, रियाज बेग, अल्ताफ अली, शफी कुरेशी सह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनी उपस्थित होते.चिमूरमुस्लिम हक्क संघर्ष समितीच्या वतीने तहसील कार्यालयासमोर मुस्लिम समाजाला आरक्षण पूर्ववत सुरू करण्यात यावे यासाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आले.मुस्लिम समाज संविधानाच्या अधिन राहूनच आरक्षणाची मागणी करीत असून शासनापुढे विविध आयोगाचा अहवाल असताना व सगळ्या आयोगाने मुस्लिम समाजाला आरक्षणाची गरज असल्याचे सांगितले असताना शासन दुजाभाव करित असल्याच्या आरोप यावेळी करण्यात आला. मुस्लिम हक्क संघर्ष समिती चिमूरच्या वतीने चिमूर येथील तहसिल कार्यालय समोरील राज्य मार्गावर चक्का जाम आंदोलन करण्यात आला. यावेळी काही काळासाठी वाहतुकीवर परिणाम झाल्याचे दिसून आले.यावेळी मुस्लिम हक्क संघर्ष समितीचे जिल्हा सल्लागार कदिर शेख, तालुकाध्यक्ष मिर्झा आबिद बेग, सचिव कलिम शेख, उपाध्यक्ष पप्पू कदिर शेख, बब्बू खान, आबिद रजा, जावा शेख, कुदहूसभाी, प्यारू मामू, जावेद बेग, फारूख भाई, फहिम भाई, नोवेत सय्यद, नासीर खान, जावेद पठाण भिसी, जुबेर शेख, रहेमान शेख, नोविद सौदागर, हबीब शेख, राजीक शेख, शफी पठाण, शाहीद पठान, इमरान शेख आदी समाजबांधव उपस्थित होते. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन सुटका केली.घुग्घुसमध्ये ७७ जणांना अटकमुस्लिम हक्क समितीच्या वतीने चंद्रपूर-घुग्घुस मार्गावर रस्ता रोको आंदोलन केले. पोलिसांनी ७७ जणांना अटक करून सुटका केली. यावेळी मुन्ना लोहानी, शफी शेख, इम्तियाज रज्जाक, जिया उल्लाह, शेख अनवर, मुस्तकीम खान, जुनेद खान, शेख हसन, खलील साबीर खान, इबादुल सिद्धिकी, आजम खान, मोमीन, भोलाभाी, सिराज शेख, शेख रमजान, ताज मोहमद यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. पोलिसांनी आंदोलनकर्त्या ताब्यात घेऊन सुटका केली. (विविध वार्ताहरांकडून)
आरक्षणासाठी मुस्लिमांचा एल्गार
By admin | Updated: March 11, 2015 01:04 IST