शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

कोरपना येथे मुस्लीम समाजाचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 23:00 IST

सकल मुस्लीम समाज आरक्षण संघर्ष समिती कोरपना वतीने मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावा, यासाठी सोमवारी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर कोरपनाचे तहसीलदार हरीश गाडे यांना मुस्लिम समाजातील दहा लहान मुलांच्या हस्ते निवेदन देण्यात आले यावेळी स्थानिक टिपू सुलतान चौक ते तहसील कार्यालयापर्यंत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : सकल मुस्लीम समाज आरक्षण संघर्ष समिती कोरपना वतीने मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावा, यासाठी सोमवारी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर कोरपनाचे तहसीलदार हरीश गाडे यांना मुस्लिम समाजातील दहा लहान मुलांच्या हस्ते निवेदन देण्यात आलेयावेळी स्थानिक टिपू सुलतान चौक ते तहसील कार्यालयापर्यंत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मुस्लिम समाज कष्टकरी व प्रामाणिक समाज म्हणून ओळखला जातो. हस्तकला, शेती, शेतमजुरी तसेच अनेक लहान-सहान, तत्सम व्यवसाय करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतो. मात्र सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक दृष्टीने पाहिजे तसा विकसित न झाल्याने मुस्लिम समाजात आजही मागासलेपणा कायम आहे. नुकतेच मराठा समाजाला शासनाने आरक्षण दिले.हा निर्णय स्वागतार्ह असून आता मुस्लिम समाजाचासुद्धा विचार करून आरक्षण द्यावे, अशी मागणी आहे. मुस्लिम समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक मागासलेपणाचा लेखाजोखा न्यायमूर्ती सच्चर समितीने सरकारपुढे ठेवला. या अहवालात मुस्लिम समाज किती मागासला आहे, याबद्दलची माहिती सरकारपुढे देण्यात आली आहे. या आधारित निकषावर मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रॅली व धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.संविधानातील कलमानुसार महाराष्ट्रातील मागासवर्गीय मुस्लिमांना विशेष मागास प्रवर्ग(अ) निर्माण करुन फक्त ५ टक्के आरक्षण सरकारने ९ जुलै २०१४ ला प्रदान केले होते. उच्च न्यायालयाने शैक्षणिक आरक्षण देण्याचे मान्य केले. परंतु सरकारने तेही आजपर्यंत दिले नाही. प्रशासकीय सेवेत आरक्षण रद्द झाले. सदर त्रुटी सुधारुन शिक्षणात व पुन: प्रशासकीय सेवेत आरक्षण बहाल करण्यात यावे. तसेच मुस्लिम विद्यार्थ्याचे स्वतंत्र वसतिगृह, मुस्लिम समाजाला अकट्रासिटी कायद्याचे संरक्षण आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.