शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

संगीताला मिळाले एल्गारचे बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:26 IST

कठीण परिस्थितीतही दोन मुलांना दिले शिक्षण भोजराज गोवर्धन मूल : मनात जिद्द, चिकाटी आणि परिश्रम करण्याची प्रबळ इच्छाशक्ती असली ...

कठीण परिस्थितीतही दोन मुलांना दिले शिक्षण

भोजराज गोवर्धन

मूल : मनात जिद्द, चिकाटी आणि परिश्रम करण्याची प्रबळ इच्छाशक्ती असली की, आकाशातही गगनभरारी घेता येते. याचे जिवंत उदाहरण मूल तालुक्यातील जानाळा येथील संगीता अनिल गेडाम यांच्याबाबतीत घडले.

मूल तालुक्यातील मौजा जानाळा येथील संगीता भीमराव नैताम हिचा १९९६ मध्ये भद्रावती तालुक्यातील मोबाळा येथील अनिल गेडाम यांच्याशी विवाह झाला. सुखी संसार सुरळीत सुरू असताना, २००३ मध्ये संगीता गेडाम ही अडीच वर्षांच्या मुलाला घेऊन जानाळा येथे बाळंतपणासाठी आली होती. दरम्यान, संगीताचे पती अनिल गेडाम यांनी क्षुल्लक कारणावरून आत्महत्या केली.

पतीने आत्महत्या केली, आता जीवन जगायचे कसे, अशा विवंचनेत सापडलेल्या संगीताचे आई आणि वडील तिच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिलेे. तिला आपल्या दोन मुलांच्या भविष्याची चिंता वाटू लागली होती, त्यामुळे ती जानाळा येथील ग्रामपंचायतीमध्ये निराधार योजनेचा फाॅर्म भरण्यासाठी गेली होती. परंतु, तिथे तिला ३०० रुपये लागतील, असे सांगितले. परंतु, तिच्याकडे एकही पैसा नसल्याने ती १५ वर्षांपूर्वी श्रमिक एल्गारचे तत्कालीन तालुकाध्यक्ष मारोती शेंडे यांच्याकडे गेली. शेंडे यांनी तिचे काम मोफत करून दिले. यामुळे ती श्रमिक एल्गारची कार्यकर्ती म्हणून काम करायला सुरुवात केली. संगीताची परिस्थिती इतकी हलाखीची होती की, ती दोन लहानलहान मुलांना शाळेत जाण्यासाठी साधा गणवेशसुद्धा घेऊन देऊ शकत नव्हती. तिची ही अडचण श्रमिक एल्गारने दूर केली. गरीब महिलांच्या कामासाठी संगीता एल्गार कार्यालयात येत असल्याने, संघटनेने तिला गरीब, कामगार, लोकांचे काम करण्यासाठी आग्रह केला. संगीतानेही तेवढ्याच आत्मीयतेने काम करण्यास होकार दिला, तेव्हापासून मूल तालुक्यातील गावागावांत जाऊन तिने निराधारांचे अर्ज भरून देण्याचे काम करीत होती. कालांतराने ती श्रमिक एल्गारची मूल तालुका सचिव म्हणून काम केले. संगीता सध्या श्रमिक एल्गार कार्यालयात डाटा एण्ट्रीचे काम करीत असून श्रमिक एल्गार कार्यालयात आलेल्या अन्यायग्रस्त नागरिकांना न्याय, हक्क मिळवून देण्याच्या कामात ती व्यस्त असते. संगीताने आपल्या मुलांना शिक्षण देण्यासाठीही खूप मेहनत घेतली. लहान मुले आता मोठी झालीत, समजदार झालीत. मोठा मुलगा मनोज हा बीए अंतिमला शिक्षण घेत आहे, तर लहान मुलगा अजय हा बीएमध्ये शिक्षण घेत आहे.