शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या

By admin | Updated: April 8, 2017 00:40 IST

येथील अमराई वॉर्डामधील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणातील तीनही आरोपींना अटक करण्यात आली.

तिघांना अटक : शेजारच्या युवकांनीच केला घात घुग्घुस : येथील अमराई वॉर्डामधील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणातील तीनही आरोपींना अटक करण्यात आली. त्यातील एक आरोपी अल्पवयीन असून तो मुलीच्या शेजारीच राहतो. न्यायालयाने त्या अल्पवयीन आरोपीला निरीक्षण कक्षात तर दोन आरोपींना १० एप्रिलपर्यत पोलीस कोठडी सुनावली. बुधवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास अमराई वॉर्डातील मुलीचे कुटुंबीय रात्रीपासून मुलगी घरून बेपत्ता असल्याची तक्रार देण्यासाठी सकाळी १० वाजताच्या दरम्यान पोलीस ठाण्यात गेले. दरम्यान, त्याच वार्डामध्ये एका युवकाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची तर कोळसा खाण क्षेत्रातील टॉवरजवळ मुलीचा मृत्यूदेह पडून असल्याची माहिती ठाण्यात आली. एकाच वेळी तीनही तक्रारी पोलीस ठाण्यात आल्याने मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार देणाऱ्या फिर्यादीला पोलिसांनी सोबत घेऊन घटनास्थळ गाठले. तेव्हा सदर मृतदेह फिर्यादीच्या मुलीचा असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तपासाची चक्रे त्या मुलीच्या घराशेजारी राहणाऱ्या व आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या मुलाकडे केंद्र्रित केले. खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या त्या मुलाभोवती पोलिसांनी गराडा घातला व रात्री त्याला ताब्यात घेऊन पोलिसी हिसका दाखवताच खुनाचे रहस्य उलगडले. खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. नंतर शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. सामूहिक अत्याचार केल्यानंतर आपले कृत्य उघडकीस येऊ नये, म्हणून मुलीचे डोके दगडाने ठेचून तिची जागीच हत्या करण्यात आली. याप्रकरणी एक अल्पवयीन आरोपी व प्रताप रमेश सिंग व आकाश राहुल देवगडे रा. अमराई वॉर्ड यांच्याविरूद्ध भादंविच्या कलम ३०२, ३७६,१२० ब १०२, बाल लौगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. पुढील तपास जिल्हा पोलीस उपअधीक्षक हेमराज राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय पोलीस अधिकारी सुशील नायक, चंद्रपूर गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सुधाकर अंभोरे, घुग्घुसचे ठाणेदार पगारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड, पोलीस उपनिरीक्षक छञपती चिडे हे करीत आहेत. (वार्ताहर)मुलीच्या वडिलांना शिविगाळहा प्रकार दाबण्यासाठी अल्पवयीन मुलाच्या वडीलांकडून मुलीच्या वडीलांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांच्या घरी जाऊन शिविगाळ करून धमकी दिल्याने नागरिकांनी ठाणेदारांना भेटून आपला संताप व्यक्त केला व आरोपीवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली. त्यामुळे अल्पवयीन आरोपीचे वडील रमेश सिंग यांच्या विरोधातही पोलिसांनी कारवाई केली.