लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मुंबईतील डोंगरी भागातील सुमारे ८० वर्षे जुनी इमारत कोसळून १४ नागरिकांचे बळी गेले. तर मालाडमध्ये संरक्षण भिंत कोसळून चार मजुरांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर लोकमतने चंद्रपुरातील धोकादायक आढावा घेण्याचा प्रयत्न केला असता शहरातील मोठ्या इमारती नसल्या तरी शेकडो घरे मात्र धोकादायक असल्याची माहिती मनपाकडून मिळाली. ही घरे धोकादायक असून कोणत्याही क्षणी कोसळू शकतात, याची जाणीव असतानाही मनपाकडून केवळ नोटीस बजावण्यापलिकडे कोणतीही कार्यवाही केली जात नाही, हेच आजवरच्या अनुभवावरुन दिसून येत आहे. चंद्रपूर मनपाचा कारभार सध्या तीन झोनमधून सुरू आहे. झोन क्रमांक १ मध्ये २५ मालमत्ता धोकादायक आहेत. झोन क्रमांक ३ मध्ये ५४ घरे धोकादायक आहे. या मालमत्ताधारकांना मनपाने नोटीस बाजवल्या आहेत. मनपाच्या रेकॉर्डवर एवढी घरे धोकादायक असली तर प्रत्यक्षात याहून अधिक घरे निर्लेखित झाली आहेत.धोकादायक इमारतींचे पुढे काय?प्रत्येक इमारतीची एक कालमर्यादा असते. शासनाने ती ठरवून दिली आहे. ५० वर्षाहून अधिक वर्ष एखाद्या इमारतीला झाले असतील तर त्या इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडीट केले जाते. इमारत कोसळण्याच्या स्थितीत असेल तर ती पाडून टाकण्याचे निर्देश दिले जाते. अन्यथा मनपाला ती पाडावी लागते. मात्र चंद्रपुरातील इमारतीचे पुढे असे काहीच झालेले दिसत नाही.बेकायदा इमारतींचा आकडाच नाहीचंद्रपूर शहरात अनेक घरे बेकायदा बांधण्यात आली आहे. या घरांना मनपाकडून किंवा नगररचना विभागाकडून रीतसर परवानगी न घेताच बांधण्यात आले आहे. या बेकायदा इमारती किती याची नोंदच एकाही झोन कार्यालयात नाही.नागरिकांनी जागृत व्हावेचंद्रपूर शहरात काही इमारती व घरे धोकादायक आहे. मनपाच्या पाहणीत ते आढळून आले आहे. या मालमत्ताधारकांना नोटीस बजावून जिवितहानी वा मोठे नुकसान होण्यापूर्वी पाडून टाकावे, असे बजावले आहे. मात्र नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नाही. आता पुन्हा एकदा नोटीस पाठविण्यात येणार आहे.- अंजली घोटेकर, महापौर, चंद्रपूरचंद्रपुरातील अनेक इमारती जुन्या आहेत. त्या पावसाळ्याच्या ऋतूत धोकादायक ठरू शकतात. विशेष म्हणजे, या इमारतींचे अद्याप स्ट्रक्चरल आॅडीटच झाले नसल्याची माहिती मनपाच्या अधिकाऱ्यांनी दिली. चंद्रपूर शहरात यावर्षी सुमारे १०९ बांधकामांना परवानगी देण्यात आल्याची माहिती आहे.
धोकादायक इमारतींकडे मनपाचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 00:30 IST
मुंबईतील डोंगरी भागातील सुमारे ८० वर्षे जुनी इमारत कोसळून १४ नागरिकांचे बळी गेले. तर मालाडमध्ये संरक्षण भिंत कोसळून चार मजुरांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर लोकमतने चंद्रपुरातील धोकादायक आढावा घेण्याचा प्रयत्न केला असता शहरातील मोठ्या इमारती नसल्या तरी शेकडो घरे मात्र धोकादायक असल्याची माहिती मनपाकडून मिळाली.
धोकादायक इमारतींकडे मनपाचे दुर्लक्ष
ठळक मुद्देअपघात घडल्यास जबाबदारी कोणाची? अनेक इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिटच नाही