‘मूल शहर, स्वच्छ शहर’ ही संकल्पना साकारण्यासाठी मूल नगर परिषदेने स्वच्छता अभियानाला सुरुवात केली आहे. शहराची ओळख ही स्वच्छतेवर अवलंबून असते. प्रथम दर्शनी येणाऱ्याला रस्ते, नाल्या स्वच्छ दिसल्या तर समाधान व्यक्त केले जाते. जागोजागी साचलेला कचरा, सर्वत्र घाणीचे साम्राज्य, उग्र वास, सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था यामुळे विविध आजाराचा सामना करावा लागतो. आजाराला रोखण्यासाठी स्वच्छता राखणे ही काळाची गरज आहे. यासाठी नगर परिषदेने स्वच्छतेचे पाऊल उचलणे गरजेचे आहे. आपल्या घरासमोरील परिसरात स्वच्छता ठेवण्यासाठी प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. फक्त नाम मात्र स्वच्छतेचा देखावा न करता सर्व पदाधिकारी, नगरसेवक, कर्मचारी व नागरिकांचा सहभाग घेणे गरजेचे आहे. नगर परिषद मूलने स्वच्छतेचे उचललेले पाऊल कौतुकास्पद आहे. मात्र ती लोक चळवळ होणे आवश्यक आहे.
मूल नगर परिषदने उचलला स्वच्छतेचा विडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:35 IST