शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

मनपाची दोन कोटींची तरतूद कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 22:33 IST

शहरातील आर्थिकदृष्ट्या मागास समाजघटकांच्या विकासासाठी विविध योजना राबविण्याच्या हेतूने दोन कोटींची तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली. परंतु योजनांचा आराखडा तयार करून निधी खर्च करण्याच्या कार्यवाहीला अद्याप गती मिळाली नाही. त्यामुळे दुर्बल घटकांमध्ये नाराजी पसरली आहे.

ठळक मुद्देदुर्बल समाज घटकांमध्ये नाराजी : अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार विकासकामे करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरातील आर्थिकदृष्ट्या मागास समाजघटकांच्या विकासासाठी विविध योजना राबविण्याच्या हेतूने दोन कोटींची तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली. परंतु योजनांचा आराखडा तयार करून निधी खर्च करण्याच्या कार्यवाहीला अद्याप गती मिळाली नाही. त्यामुळे दुर्बल घटकांमध्ये नाराजी पसरली आहे.शहरातील अनेक प्रभागामध्ये आर्थिक मागासवर्गीय समाजाची संख्या बरीच आहे. या प्रभागात रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता आणि सामाजिक न्याय विकासाच्या विविध योजना राबविण्यासाठी मनपाने आर्थिक तरतूद करणे नियमानुसार बंधनकारक आहे. त्यानुसार २०१८-१९ च्या अंदाजपत्रकात दोन कोटींची तरतूद करण्यात आली. या निधीतून विविध विकासकामे पूर्ण करण्याचे नियोजन मनपाने केले होते. बाबूपेठ, तुकूम, बंगाली कॅम्प, जलनगर आदींसह अन्य वॉर्डांमध्ये आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबाची संख्या सर्वात मोठी आहे. त्यामुळे विकासाची कामे प्राधान्याने सुरू करण्याची ग्वाही मनपातील सत्ताधाऱ्यांनी दिली होती. परंतु, अर्थसंकल्पातील प्रस्तावित कामे सुरू झाली नाही, असा आरोप आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिक करीत आहेत. सामाजिक न्यायाच्या विविध योजनांनाही चालना मिळाली नसल्याचे गरजू लाभार्थ्यांचे म्हणणे आहे. शहरातील महिला व बालकांच्या कल्याणाची जबाबदारी पूर्ण करण्याचे आश्वासने मनपाने दिले होते. त्यानुसार २०१८-१९ वर्षाकरिता महिला व बालकांच्या विश्रामगृहासाठी ९० लाख, बालोद्यानासाठी ९० लाख व इतर सुविधांसाठी दोन कोटी असे एकूण तीन कोटी ९३ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. पण ही कामे पूर्णत्वास आली नाहीत. दिव्यांग कल्याण योजनांसंदर्भातही हाच प्रकार घडल्याचा आरोप दिव्यांग संघटनेने केला. दिव्यांग कल्याणासाठी तयार केलेल्या धोरणानुसार मनपाने दोन कोटींची तरतूद केली आहे.हेही महत्त्वाचे...मनपाने शहरातील अनेक प्रभागात रस्ते व नाल्यांचे बांधकाम वेगाने करीत आहे. ही मोठी उपलब्धी असली तरी सामाजिक न्यायाच्या योजनांनाही विशेष प्राधान्य द्यावे, अशी मागणी गरजुंनी केली.शहरातील मूलभूत कामे पूर्ण करा- राहुल पावडेलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील दोन आठवड्यांपासून सतत पाऊस सुरू असल्याने शहरातील रस्ते, सांडपाणी वाहून नेणाºया नाल्या, पूल व पथदिव्यांची दुरवस्था झाली आहे. नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मूलभूत स्वरूपाची कामे तातडीने पूर्ण करावे, असे निर्देश महानगरपालिका स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे यांनी दिले. स्थायी समिती सभागृहात शुक्रवारी पार पडलेल्या बैठकीत ते बोलत होते.मुसळधार पावसामुळे शहरातील विविध प्रभागात निर्माण झालेल्या समस्यांचा आढावा घेण्यात आला. नागरिकांना त्रास होवू नये, यासाठी अधिकाºयांनी कंत्राटदारांना कामाला लावावे. अनेक रस्त्यांवर खड्डे पडले. काही ठिकाणी पाणी साचले. नाल्या चोकअप झाल्या. पथदिवेही बंद आहेत. अशा ठिकाणी साहित्याचा पुरवठा करून समस्या मार्गी लावावे. यासाठी जास्तीचा निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही सभापती पावडे यांनी दिली.अमृत योजनेअंतर्गत रस्त्याच्या कडेला गट्टू लावून स्वच्छता करावी. झोन क्र. १, २ व ३ मध्ये कोणतीही अडचण येणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असे निर्देश त्यांनी सभेत दिले. यावेळी नगरसेवक, अतिरिक्त आयुक्त बेहरे, उपायुक्त गोस्वामी, बोकडे व देवळीकर, नगर सचिव अ.फैज काझी उपस्थित होते.