शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

मनपाचा कारभार लवकरच चालणार नव्या इमारतीमधून

By admin | Updated: August 25, 2014 23:54 IST

चंद्रपूर शहर महानगरपालिकेचा कारभार लवकरच गांधी चौकातील नवीन प्रशासकीय इमारतीमधून चालणार आहे. या नवनिर्मित प्रशासकीय इमारतीचे सोमवारी पालकमंत्री संजय देवतळे

चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिकेचा कारभार लवकरच गांधी चौकातील नवीन प्रशासकीय इमारतीमधून चालणार आहे. या नवनिर्मित प्रशासकीय इमारतीचे सोमवारी पालकमंत्री संजय देवतळे यांच्या हस्ते थाटात उदघाटन झाले. अध्यक्षस्थानी महापौर संगिता अमृतकर होत्या.नगरपालिका अस्तित्वात असतानाच या इमारतीच्या बांधकामाला मंजुरी मिळाली होती. तेव्हापासून इमारतीचे बांधकाम सुरू होते. यादरम्यान आधी नगरपालिका आणि आता महापालिकेचे कामकाज पालिकेच्या सातमजली इमारतीमधूनच चालत होते. आता या इमारतीचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. नवनिर्मित नगर सभागृहामध्ये १४० सदस्यांसोबत पत्रकारांनाही बसण्याची व्यवस्था आहे. सभागृहामध्ये चर्चेसाठी विशेष प्रोजेक्टरही लावण्यात आले आहे. या कार्यक्रमात चंद्रपूरचे आजपर्यंतचे माजी नगराध्यक्ष यांचाही सत्कार करण्यात आला. यात गयाचरण त्रिवेदी, रमेश कोतपल्लीवार, विजय राऊत, दीपक जयस्वाल, सुनिता लोढिया, बिताताई रामटेके, सुरेश महाकूळकर, मनोहर पाऊणकर व प्रभाकर पटकोटवार यांचा समावेश होता. या कार्यक्रमाचे औचित्य साधून चंद्रपूर पंचशताब्दीच्या निधीतून मंजूर झालेल्या पाईपलाईन टाकण्याच्या कामाचे भूमिपूजनही पालकमंत्री संजय देवतळे यांच्या हस्ते करण्यात आले.नवनिर्मित प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार हंसराज अहीर, आ. सुधीर मुनगंटीवार, आ. नाना श्यामकुळे, आ. सुभाष धोटे, आ. विजय वडेट्टीवार, आ. अतुल देशकर, आ. मितेश भांगडिया, आ. शोभाताई फडणवीस, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राजीव जैन, मनपा आयुक्त सुधीर शंभरकर, उपमहापौर संदीप आवारी, सभापती रितेश तिवारी आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)