शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

घंटागाडी कामगारांच्या बेमुदत संपाने मनपा हादरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 00:20 IST

चंद्रपूर शहरांमध्ये कचरा संकलन करणारे घंटागाडी कामगार तसेच वाहनचालक यांनी आज १९ आॅगस्टपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले. ंंएरवी सकाळी ६ वाजतापासून सुरू होणाऱ्या या कामगारांची लगबग आज बंद होती. एकाही घरी हे कामगार कचरा संकलनासाठी गेले नाही.

ठळक मुद्देचंद्रपूरकरांची गैरसोय टळली : सहा तासात कामगारांच्या मागण्या मान्य

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर शहरांमध्ये कचरा संकलन करणारे घंटागाडी कामगार तसेच वाहनचालक यांनी आज १९ आॅगस्टपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले. ंंएरवी सकाळी ६ वाजतापासून सुरू होणाऱ्या या कामगारांची लगबग आज बंद होती. एकाही घरी हे कामगार कचरा संकलनासाठी गेले नाही. त्यामुळे चंद्रपूरकरांचीही मोठी गैरसोय झाली. यामुळे महानगरपालिका प्रशासनात एकच खळबळ उडाली. त्यामुळे अवघ्या सहा तासात कामगारांच्या मागण्या मनपा प्रशासनाने मान्य केल्या आणि कामगारांचा संप पाच तासातच यशस्वीरित्या गुंडाळला.मागील अनेक महिन्यांपासून जन विकास कामगार संघाच्या माध्यमातून घंटा गाडीवर काम करणाºया कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी पप्पु देशमुख यांनी पाठपुरावा केला होता. याबाबत १८ जून २०१९, २७ जुलै २०१९ रोजी कामगारांच्या विविध मागण्यांबाबत लेखी निवेदन दिले. २९ जुलै रोजी सर्व कामगारांनी महानगरपालिकेसमोर निदर्शने आंदोलन करून बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर १६ आॅगस्ट रोजी स्मरणपत्रसुद्धा दिले. मात्र वारंवार लेखी मागणी करूनही मनपा प्रशासन व सीडीच्या व्यवस्थापनाने दुर्लक्ष केल्यामुळे जन विकास कामगार संघाने बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले. यानंतर मनपा प्रशासनाने तडकाफडकी काल १८ आॅगस्टला रविवारी सुटीच्या दिवशी कामगारांच्या समस्याबाबत बैठक लावण्याचे पत्र काढण्यात आले. आज सोमवारी सकाळी ७ वाजतापासून घंटागाडी कामगारांनी बेमुदत काम बंद सुरू केल्यानंतर साडेदहा वाजता महानगर पालिकेतील आयुक्तांच्या सभा कक्षामध्ये बैठक सुरू झाली. या बैठकीला मनपाचे उपायुक्त बोकडे, जन विकासचे अध्यक्ष पप्पू देशमुख, स्वच्छता विभागाचे संतोष गर्गेलवार, सेंटर फॉर डेव्हलपमेंट कम्युनिकेशनचे प्रतिनिधी समर्थ, सुपरवायझर अविनाश कोतपल्लीलवार,रतन गायकवाड, गौरव तपासे, डोंगरे, कोंडबाजी मून, महेश गुरुदेव उपस्थित होते.काढलेल्या कामगारांना पुन्हा घेतलेराजकुमारी छतरे, सरोज अंडेलकर व डोंगरे या कामगारांना कामावरून कमी करण्यात आले होते. दरम्यान, आजच्या आंदोनलनानंतर या कामगारांना पूर्ववत घेण्याचे तसेच त्यांचा कामावरून कमी केलेल्या दिवसांचा पगार देण्याचेसुद्धा मनपा उपायुक्त बोकडे व सीडीसी व्यवस्थापनाने मान्य केले.

टॅग्स :Strikeसंप