शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

मनपा करणार ९७ हजार वृक्षांची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 23:38 IST

राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पर्यावरण संरक्षणाकरिता या वर्षी १३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केलेला आहे. या संदर्भात समाजाच्या सर्व स्तरात जागरुकता निर्माण करण्याच्या तयारीची आढावा बैठक महापौर अंजली घोटेकर व आयुक्त संजय काकडे यांच्या अध्यक्षतेखाली मनपा सभागृहात घेण्यात आली.

ठळक मुद्देमनपाची आढावा बैठक : उद्दिष्टापेक्षा जास्त वृक्ष लावणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पर्यावरण संरक्षणाकरिता या वर्षी १३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केलेला आहे. या संदर्भात समाजाच्या सर्व स्तरात जागरुकता निर्माण करण्याच्या तयारीची आढावा बैठक महापौर अंजली घोटेकर व आयुक्त संजय काकडे यांच्या अध्यक्षतेखाली मनपा सभागृहात घेण्यात आली.याप्रसंगी बोलताना महापौर म्हणाल्या पर्यावरण संरक्षणासाठी किमान ३३ टक्के वनक्षेत्र असणे गरजेचे आहे. मात्र हे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. मागील वर्षी आपण सर्वांच्या सहकार्याने अपेक्षित उद्दिष्टाच्या दुप्पट झाडे लावली. मात्र आपले शहर हे जगातील सर्वात उष्ण हवामानाचे शहर असल्याने पर्यावरणाप्रती आपली जवाबदारीही दुप्पट आहे. चंद्रपूरची जनता आम्हाला साथ देईल, शासनाच्या वृक्षलागवडीत पुढाकार घेईल असा विश्वास व्यक्त करीत प्रत्येकाने किमान एका तरी झाडाचे पालकत्व घेऊन त्याचे संगोपन करावे, असे आवाहन त्यांनी केले.तर वृक्षलागवड संदर्भात माहिती देताना आयुक्त संजय काकडे म्हणाले, मनपातर्फे शासनाने ६० हजार झाडे लावावे, असे आवाहन दिले आहे. मात्र मनपाने ९७ हजार झाडांचे नियोजन केले आहे. शहरातील १८ ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार असून कुंपणावर विशेष लक्ष देण्यात ठेवण्यात येणार आहे. तसेच नागरिकांना विवाह, जन्म, मृत्यूचे प्रमाणपत्र देताना रोपटे देण्यात येणार आहेत. तसेच यावर्षी १०० टक्के झाडे जगविण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.सभेला स्थायी समिती सभापती राहुल पावडे, गटनेता वसंत देशमुख, उपायुक्त विजय देवळीकर, सहायक आयुक्त सचिन पाटील, शीतल वाकडे, बारई, हजारे, इको प्रो संस्था, रेडक्रॉस सोसायटी, रोटरी क्लब, विश्व मानव केंद्राचे प्रतिनिधी उपस्थित होते.