शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

धूर फवारणीबाबत महानगरपालिका उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 23:36 IST

पावसाळ्याच्या तोंडावर नाल्या, गटारांची स्वच्छता आणि पावसाळ्यात नियमित धूर फवारणी हे नागरी आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. सहाजिकच ही जबाबदारी महानगरपालिका प्रशासनाला पेलायची असते. मात्र पावसाळा सुरू होऊनही मनपा प्रशासनाला एकदोन वॉर्डाचा अपवाद सोडला तर धूर फवारणीचा मुहुर्तच सापडेलेला दिसत नाही. मनपाच्या या हलगर्जीपणामुळे चंद्रपुरातील प्रत्येक वॉर्डात डासांचा प्रचंड प्रादुर्भाव झाला आहे. हा आणखी वाढून मलेरिया, व्हायरल फिवरचा प्रकोप वाढण्याची जणू मनपा प्रशासन प्रतीक्षा करीत असल्याचे दिसते.

ठळक मुद्देरुग्णांतही वाढ : डासांच्या प्रादुर्भावाने चंद्रपूरकर वैतागले

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पावसाळ्याच्या तोंडावर नाल्या, गटारांची स्वच्छता आणि पावसाळ्यात नियमित धूर फवारणी हे नागरी आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. सहाजिकच ही जबाबदारी महानगरपालिका प्रशासनाला पेलायची असते. मात्र पावसाळा सुरू होऊनही मनपा प्रशासनाला एकदोन वॉर्डाचा अपवाद सोडला तर धूर फवारणीचा मुहुर्तच सापडेलेला दिसत नाही. मनपाच्या या हलगर्जीपणामुळे चंद्रपुरातील प्रत्येक वॉर्डात डासांचा प्रचंड प्रादुर्भाव झाला आहे. हा आणखी वाढून मलेरिया, व्हायरल फिवरचा प्रकोप वाढण्याची जणू मनपा प्रशासन प्रतीक्षा करीत असल्याचे दिसते.नाल्या, गटारे चोकअप होऊन पावसाळ्यात घाणीचे साम्राज्य निर्माण होऊ नये, साथीचे आजार बळाऊ नये, यासाठी उन्हाळ्याच्या अखेर शहरातील नाल्या, गटारांचा उपसा करून स्वच्छता मोहीम राबविणे गरजेचे आहे. यावर्षी मनपाने नाल्या, गटारांची सफाई केली. मात्र ही सफाई थातूरमातूर होती. चंद्रपूर शहरातून मोठे नाले वाहतात. या नाल्यांवर अनेक ठिकाणी अतिक्रमण करून पक्के बांधकाम केले आहे. त्यामुळे या नाल्यांचा उपसा होऊ शकत नाही. जोरदार पाऊस झाला की नाल्यातील घाण रस्त्यावर येते. असा अनुभव दरवर्षी येतो. यावर्षीही येत आहे. परिणामी मनपाची नाले सफाई यंदाही फार्स ठरली आहे.यासोबतच पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी जमा होत असल्याने डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होते. अशावेळी विविध प्रकारच्या औषधांची फवारणी, धूर फवारणी करणे गरजेचे असते. नागरी आरोग्य अबाधित रहावे, यासाठी महानगरपालिकेने नियमितपणे ही कामे करावयाची असतात. मात्र या कामाचा सध्या मनपालाच विसर पडल्याचे दिसून येत आहे.चंद्रपूरचा वाढता विस्तार बघता मनपा प्रशासनाची कामे सुरळीत पार पडण्याकरिता मनपाने झोननिहाय विभागणी केली आहे. तीन झोन कार्यालयातून हा कारभार चालविला जातो. महानगरपालिकेच्या कार्यालयात जेवढे विभाग आहेत, ते सर्व विभाग या झोन कार्यालयात कार्यान्वित झाले आहे. विविध औषधांची फवारणी आणि धूर फवारणीही याच झोन कार्यालयाच्या माध्यमातून केली जाते. वॉर्डनिहाय धूर फवारणी करण्याचे वेळापत्रकच महानगरपालिकेत तयार असते. असे असले तरी धूर फवारणीत कसूर केली जात असल्याचे दिसून येत आहे.औषधांची फवारणी आणि फागिंग मशीनद्वारे केली जाणारी धूर फवारणी होत नसल्यामुळे अनेक वॉर्डात डासांचा प्रचंड प्रादुर्भाव झाला आहे. डासांमुळे चंद्रपूरकरांची झोपच उडाली आहे. यामुळे मलेरिया, डेंग्यूसारख्या आजाराने डोके वर काढणे सुरू केले आहे. चंद्रपूर शहरात मागील काही दिवसात तापाच्या रुग्णातही वाढ झाली आहे. अनेक रुग्ण मलेरियाने बाधित होऊन खासगी दवाखान्यात उपचार घेत आहे. डासांच्या प्रकोपामुळे चंद्रपूरकर वैतागले असतानाही मनपाला मात्र त्याचे काही देणे घेणे असल्याचे दिसून येत नाही.प्रत्येक झोनमध्ये तीन फॉगिंग मशीन्सडासांचा नाईनाट करण्यासाठी इतर साधनांपेक्षा फॉगिंग मशीनने केलेली धूर फवारणी उपयुक्त ठरते. त्यामुळे प्रत्येक शहरात ही फवारणी नियमितपणे करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. महानगरपालिकेत एक चारचाकी वाहनांवर असलेली मोठी फॉगींग मशीन व तीनही झोन कार्यालयात प्रत्येक तीन फॉगींग मशीन्स उपलब्ध असल्याची माहिती आहे. झोन कार्यालयाशी संलग्न असलेल्या प्रत्येक वॉर्डात आठ किंवा पंधरा दिवसाआड फॉगींग मशीनद्वारे धूर फवारणी करणे आवश्यक आहे. मात्र काही वॉर्डाचा अपवाद सोडला तर चंद्रपुरातील बहुतांश वॉर्डात अद्यापही धूर फवारणी झाली नाही.नगरसेवकांचेही आपल्या प्रभागाकडे दुर्लक्षशहरात नियमितपणे फॉगींग मशीनद्वारे धूर फवारणी करण्याची जबाबदारी मनपा प्रशासनाची आहे. मात्र यात मनपा प्रशासन हलगर्जीपणा करीत असल्याने आता प्रत्येक प्रभागातील नगरसेवकांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. नगरसेवकांनी आपल्या प्रभागात धूर फवारणी करण्यासाठी मनपा प्रशासनाला बाध्य करावे, अशी नागरिकांची मागणी आहे.