शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महानगरपालिका भ्रष्टाचाराने बरबटली

By admin | Updated: July 16, 2014 23:59 IST

मनपाच्या आमसभेत एखाद्या विषयाला बहुसंख्य नगरसेवकांनी कडाडून विरोध केला तरी मनपाचे पदाधिकारी आपल्या सोईनुसार प्रोसेडींग बुकमध्ये ठराव लिहितात. आपल्या स्वार्थासाठी जनतेचे

चंद्रपूर : मनपाच्या आमसभेत एखाद्या विषयाला बहुसंख्य नगरसेवकांनी कडाडून विरोध केला तरी मनपाचे पदाधिकारी आपल्या सोईनुसार प्रोसेडींग बुकमध्ये ठराव लिहितात. आपल्या स्वार्थासाठी जनतेचे अहित करून कंत्राटदारांना मदत केली जाते. एकूणच महापालिकेचा कारभार आता भ्रष्टाचाराने बरबटला आहे, असा आरोप खुद्द सत्ताधारी काँग्रेस नगरसेवकांनीच केला आहे. या संदर्भातील एक तक्रार त्यांनी आयुक्तांकडे केली आहे.३० जूनच्या आमसभेत विषय क्रमांक २९ वर रिलायन्स जीओला खोदकाम करण्यास परवानगी देणे, टॉवर्स उभारण्याला परवानगी देणे या विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी काँग्रेस, भाजपा व इतर पक्षाच्या ५० ते ५५ नगरसेवकांनी रिलायन्स जीओला परवानगी देण्याला विरोध दर्शविला. असे असताना प्रोसेडींग बुकमध्ये रिलायन्स जीओला मदत करण्यासाठी ठराव चुकीच्या पध्दतीने लिहिण्यात आला, असा आरोप काँग्रेसचे गटनेता प्रशांत दानव, नगरसेवक प्रविण पडवेकर, अशोक नागापुरे यांनी केला आहे.असा प्रकार पहिल्यांदाच झाला नसून अनेकदा सर्वसाधारण सभेत चर्चा एक होते आणि महापौर व इतर पदाधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून प्रोसेडींग बुकमध्ये वेगळ्या पध्दतीने लिहिण्यात येते. रिलायन्स जीओचे टॉवर्स रहिवासी भागात, शाळा-महाविद्यालय व दवाखान्याच्या परिसरात उभारल्यास त्याचे काय दुष्परिणाम होतात, हे जगाला माहित आहे. नागरिक रस्ते, वीज, ड्रेनेज सिस्टीम, सिव्हरेज सिस्टीम, स्वच्छता या गोष्टीसाठी नगरसेवकांना निवडून देतात. शासनही नागरिकांच्या विविध कराच्या रकमेचा त्यांच्या सुविधांसाठी उपयोग व्हावा, या उद्देशाने आयुक्त व इतर अधिकाऱ्यांच्या नियुक्ती करते. अशावेळी सभेत बहुमतात जो ठराव घेण्यात येतो, त्याला मंजुरी देणे अपेक्षित आहे. मात्र बहुमताच्या बाजूने न जाता महापौर व इतर पदाधिकारी नगर सचिवांवर दबाव आणून चुकीच्या पध्दतीने प्रोसेडींगमध्ये ठराव लिहित आहे.असा प्रकार दखलपात्र गुन्हा असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे व्हीडीओ रेकॉर्र्डींग पाहून सभेत जे घडले तेच बुकमध्ये लिहावे व जनहित याचिकेवर न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत शहरात मोबाईल टॉवर्स उभारू नये, अशी मागणीही पडवेकर, दानव व नागापुरे यांनी आयुक्तांकडे केली आहे. (शहर प्रतिनिधी)