शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

विकास आराखड्यासाठी मनपा समिती नेमणार

By admin | Updated: November 20, 2014 22:49 IST

राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मनपाच्या आढावा सभेत केलेल्या सूचनेवरून शहर विकास आराखडा तयार करण्यासाठी समिती नेमण्याचा ठराव आज गुरुवारी झालेल्या आमसभेत

चंद्रपूर : राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मनपाच्या आढावा सभेत केलेल्या सूचनेवरून शहर विकास आराखडा तयार करण्यासाठी समिती नेमण्याचा ठराव आज गुरुवारी झालेल्या आमसभेत पारित करण्यात आला. फेब्रुवारीपर्यंत हा आराखडा तयार केला जावा, असा निर्णयही या सभेत घेण्यात आला.महानगरपालिकेच्या आमसभेत आज गुरुवारी सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी महापौर राखी कंचर्लावार होत्या. महानगरपालिका झाल्यानंतरही अडीच वर्षात चंद्रपूरचा पाहिजे तसा विकास झाला नाही. त्यामुळे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर शहराच्या मुख्य समस्या सोडविणारा विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आजच्या आमसभेत यावर गांभीर्याने चर्चा करण्यात आली. शहर विकास आराखडयासाठी एम समिती नेमण्याचा निर्णयही घेण्यात आला. यापूर्वी कचरा उचलण्याचे कंत्राट देऊनही शहरातील केरकचरा साफ होऊ शकला नाही. त्यामुळे घराघरांतून कचरा संकलन करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या विचाराधीन होता. आज यावर चर्चा करण्यात आली. यानंतर डोअर टू डोअर घंटागड्या जाईल व घराघरातून कचरा संकलन केला जाईल. या कामाचे खासगी कंपनीला कंत्राट देण्याचा ठरावही आज पारित करण्यात आला. विशेष म्हणजे, यापुढे सार्वजनिक ठिकाणी घाण करणाऱ्यांवर आळा बसविण्यासाठी महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. एखाद्या व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी घाण करताना आढळला तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. ही कारवाई करण्याचे अधिकारी मनपा कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. याबाबत सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. यासोबतच एलबीटीपासून व्यावसायिकांना तुर्तास सूट नसल्याचे आजच्या सभेत स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे एलबीटी व्यावसायिकांना भरावाच लागणार आहे. (शहर प्रतिनिधी)