शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कर चोरीवर मनपा आयुक्तांची टाच

By admin | Updated: July 16, 2014 00:04 IST

येथील मनपाचे नवे आयुक्त सुधीर शंभरकर यांनी आल्याआल्या कर चोरीवर टाच घालण्याचा प्रयत्न करून आपल्या कामाची ‘स्टाईल’ मंगळवारी दाखवून दिली.

प्रभारी कर पर्यवेक्षकाचे निलंबन : प्रतिष्ठित डॉक्टरच्या इमारतीसाठी दिलेल्या परवानगीत घोळचंद्रपूर : येथील मनपाचे नवे आयुक्त सुधीर शंभरकर यांनी आल्याआल्या कर चोरीवर टाच घालण्याचा प्रयत्न करून आपल्या कामाची ‘स्टाईल’ मंगळवारी दाखवून दिली.शहरातील प्रतिष्ठीत डॉक्टर कुबेर कोतपल्लीवार यांच्या व्यावसायिक इमारतीसाठी परवानगी देताना कर चोरीला पाठबळ देण्याचा आरोप ठेवून मनपातील प्रभारी कर पर्यवेक्षक ए.एम.बेग यांना त्यांनी तडकाफडकी निलंबित केले. यामुळे मनपात खळबळ उडाली आहे.ए.एम. बेग हे कर विभागात वरिष्ठ लिपिक असून बरेच दिवसांपासून प्रभारी कर पर्यवेक्षक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. एखाद्या विभाग प्रमुखाला निलंबित करण्याची ही मनपातील पहिलीच वेळ असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. डॉ. कुबेर कोतपल्लीवार यांचे निवासस्थान, नर्सिंग होम आणि मेडिकल स्टोअर्स असलेल्या इमारतीच्या कर चुकवेगिरीवरुन हे प्रकरण घडले आहे. या प्रकरणी सुधीर शंभरकर यांना विचारणा केली असता, त्यांनी निलंबनाला दुजोरा दिला. ते म्हणाले, काही दिवसांपूर्वी डॉ. कुबेर यांचे सर्व सुविधायुक्त असलेल्या १०० खाटांच्या रूग्णालयाचे एक पत्रक आपणास मिळाले होते. त्यावरून आपली ुउत्सुकता जागविल्याने या इमारतीची फाईल कर विभागातून मागविली. त्यात, २००२-०३ पासून केवळ निवासी इमारतीपोटी कर वसूल केल्याचे निदर्शनास आले. व्यावसायिक कर आकारणी का नाही, या संदर्भात कर विभागाचे पर्यवेक्षक बेग यांना विचारणा केली. निवासी इमारतीचे व्यावसायिक इमारत दर्शविण्याचे का टाळले याचे उत्तर तीनवेळा संधी देवूनही बेग समाधानकारक देऊ शकले नाहीत. यात टाळाटाळ होत असल्याचे आणि जबाबदारी दुसऱ्यावर ढकलण्याचे निदर्शनास आल्याने निलंबनाचा निर्णय घेण्यात आला, असे शंभरकर यांनी स्पष्ट केले. (जिल्हा प्रतिनिधी)