शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेचे स्वच्छता अभियान बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:44 IST

बंधारा दुरूस्तीसाठी निधी द्यावा वरोरा : तालुक्यातील अनेक बंधाऱ्यांची दयनीय अवस्था झाली आहे. शासनाने शिवारात अनेक बंधारे बांधले. बंधाऱ्यात ...

बंधारा दुरूस्तीसाठी निधी द्यावा

वरोरा : तालुक्यातील अनेक बंधाऱ्यांची दयनीय अवस्था झाली आहे. शासनाने शिवारात अनेक बंधारे बांधले. बंधाऱ्यात सध्या पाणी आहे. मात्र, काही ठिकाणी बोगदे पडल्याने पाणी वाया जात आहे. त्यामुळे दुरुस्ती करून दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

सिमेंटीकरणाची नागरिकांची मागणी

चंद्रपूर : येथील तुळशीनगर, वृंदावन नगरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नाल्या नसल्यामुळे रस्त्यांवर पाणी साचून चिखल साचला आहे.

पोषण आहारात केवळ कडधान्य

चंद्रपूर : कोरोनामुळे यावर्षी जनजीवन विस्कळीत झाले. दरम्यान, याचा फटका शाळा, महाविद्यालयालाही बसला आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे काही प्रमाणात शाळा सुरू झाल्या आहे. मात्र अजूनही त्या पूर्व पदावर आल्या नाही. प्राथमिकच्या विद्यार्थ्यांना अद्यापही सुटीच आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षकांद्वारे घरपोच पोषण आहार पुरविला जात आहे. मात्र यामध्ये केवळ कडधान्यच दिले जात असून तेल, तिखट यातून गायब झाले आहे.

घाण करणाऱ्यांवर कारवाई करावी

पोंभुर्णा : तालुक्यातील बहुतेक शासकीय कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात घाण पसरली आहे. मात्र, अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाई केली जात नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

तीर्थक्षेत्राचा विकास करावा

भद्रावती : तालुक्यात अनेक धार्मिक ठिकाणे आहेत. दरम्यान देऊरवाडा येथे अनेकांना तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन येथील पायाभूत विकास करावा, अशी मागणी भाविकांकडून व्यक्त केली जात आहे. या ठिकाणी सुविधा पुरविण्यात आल्यास येथील पर्यटन विकास साधला जाईल.

कोरपना येथे गॅस एजन्सीची मागणी

कोरपना : कोरपना तालुक्याचे ठिकाण आहे. मात्र, अधिकृत गॅस एजन्सी नसल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणी येत आहे. येथे अधिकृत गॅस एजन्सी द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. कोरपना येथे अधिकृत गॅस एजन्सी नसल्याने गॅस कनेक्शनधारकांना ५० किलोमीटर अंतरावरील बल्लारपूरला जावे लागते. येथील एजन्सी आठवड्यातून एकच दिवस सुरू राहत असल्याने नागरिकांना अनेक वेळा वापस जावे लागते. गॅस कनेक्शनविषयी काही अडचणी निर्माण झाल्यास बल्लारपूरलाच जावे लागते. त्यामुळे येथे अधिकृत एजन्सी देऊन ग्राहकांना दिलासा द्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

कोरपना-उमरेड बसची मागणी

चंद्रपूर : कोरपना येथून वणी-चिमूरमार्गे उमरेड बससेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. या बस सेवेमुळे कोरपना येथील नागरिकांसह वणी, वरोरा, चिमूर परिसरातील प्रवाशांना सोयीचे होईल. या संदर्भात आगारप्रमुखांना निवेदन देण्यात आले आहे.

धूर फवारणी करण्याची मागणी

वरोरा : शहरात डासांची उत्पत्ती वाढली आहे. कोरोना आजाराच्या प्रतिबंधासाठी शहरात जागृती केली जात आहे. नगरपरिषद प्रशासनाने डासांच्या बंदोबस्तासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. काही मोकळ्या भूखंडावर आजही मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे याचाही धोका नागरिकांना आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.

पारंपरिक टोपल्यांना सुगीचे दिवस

चंद्रपूर : कोरोना संकटामुळे यावर्षी जनजीवन विस्कळीत झाले आहे. सध्या परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे समारंभाचे आयोजन केले जात आहे. सध्या उन्हाळ्याची चाहूल सुरू झाली आहे. त्यामुळे लग्न सण समारंभाचेही आयोजन केले जात आहे. एरव्ही विशेष उपयोगात येत नसलेल्या सूप, टोपल्या, पारड्या, डाले आदी वस्तू खरेदीची लगबग सुरू झाल्याने पारंपरिक सूप, टोपल्या आदींना सुगीचे दिवस आले आहे.

देवाच्या परडीची मागणी वाढली आहे. ग्रामीण भागात देवाच्या परडीला अशावेळी वेगळे महत्त्व असते. परडीत देव ठेवून त्याची पूजा केली जाते. लग्नसराईमुळे अशा परडीच्या मागणीत वाढ झाली आहे. यातही वेगवेगळ्या आकाराच्या परड्या उपलब्ध आहेत. लग्नघरी छोट्या आकाराच्या टोपल्याही अशावेळी महत्त्वाच्या असतात. त्या बनविण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागत असल्याचे विक्रेते सांगतात.

विना नंबरप्लेट असणाऱ्या वाहनावर कारवाई करा

चंद्रपूर : रस्त्यावरील वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी व सुरळीतपणे होण्यासाठी परिवहन विभाग प्रत्येक स्वयंचलित दुचाकी व चारचाकी वाहनांना विशिष्ट नंबर देतात, परंतु अलीकडे जिल्ह्यात विना नंबरच्या नवीन गाड्यांसोबतच विना नंबरची अनेक जुनी वाहनेही रस्त्यावरून धावताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच चंद्रपूर नागपूर रस्त्यावर स्टंटबाजी करताना, एका निरपराध दुचाकीस्वाराचा अपघात झाला. यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या घटनेकडे लागले होते. दरम्यान, पोलीस प्रशासनाने स्टंटबाजी करणाऱ्यांना अटक केली आहे. मात्र, विना नंबर प्लेट वाहनचालक बिनधास्तपणे आपले वाहन दामटत आहे. यावर आळा घालणे गरजेचे आहे.