लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : माजी अर्थमंत्री तथा बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी मुंबई विधानभवनात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या समक्ष आमदार म्हणून शपथ घेतली. आ. मुनगंटीवार यांच्या मुलीचा विवाह सोहळा १ डिसेंबर रोजी नागपूर येथे संपन्न झाला. त्यामुळे ते सभागृहात शपथ घेऊ शकले नव्हते. आज विधानसभा अध्यक्षांसमक्ष विधानसभा सदस्य म्हणून त्यांनी शपथ घेतली. आ. मुनगंटीवार हे गेली सहा टर्म सलग विधानसभा सदस्य आहे. १९९५ साली ते प्रथमत: विधानसभागृहाचे सदस्य झाले. तीन टर्म मध्ये ते चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे सदस्य होते. २००९ मध्ये मतदार संघ पुनर्रचनेनंतर शेजारच्या बल्लारपूर क्षेत्रातून निवडणूक लढविली. सलग 3 वर्षे ते या क्षेत्रातून विजयी झाले.
मुनगंटीवार यांनी घेतली विधानसभा सदस्यत्वाची शपथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 06:00 IST