शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

मुनगंटीवार, आत्राम, सप्रे, आर्इंचवार यांना पुरस्कार घोषित

By admin | Updated: January 12, 2017 00:36 IST

लोकसेवा आणि विकास संस्थेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा बुधवारी करण्यात आली.

चंद्रपूर : लोकसेवा आणि विकास संस्थेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा बुधवारी करण्यात आली. यात जिल्ह्यातील चार जणांना पुरस्कार घोषित झाले. १४ जानेवारीला सकाळी ११ वाजता स्थानिक सरदार पटेल महाविद्यालयाच्या सभागृहात या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे.हे आहेत पुरस्काराचे मानकरीना. सुधीर मुनगंटीवार. ना. सुधीर मुनगंटीवार हे केवळ चंद्रपूर नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या गौरवाचे प्रतिक आहेत. १९७९ साली सरदार पटेल महाविद्यालय छात्रसंघाचे सचिव म्हणून ते निवडूण आले. आणि वयाच्या अवघ्या अवघ्या १७ वर्षापासून त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला. १९८१ साली महाराष्ट्र भाजपचे सचिव पद त्यांच्याकडे आले. सतत पाचवेळा ते आमदार म्हणून निवडून आले. २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात अर्थ व नियोजन आणि वनमंत्री हा महत्वाचा पदभार ते सांभाळत असून यापूर्वी पर्यटन मंत्री म्हणूनही त्यांनी कार्यभार सांभाळला आहे.भाग्यश्री आत्राम. राजघराण्याचा वारसा लाभलेल्या भाग्यश्री आत्राम या आत्राम घराण्याचा चौथ्या पिढीचा वारसा चालवित आहेत. अहेरी, गडचिरोलीसारख्या शैक्षणिक, सामाजिक दृष्टीने अत्यंत मागासलेल्या भागात राहून या भागातील लोकांच्या विकासासाठी कटीबद्ध आहेत. जिल्हा परिषद गडचिरोलीच्या त्या माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्या आहेत. गडचिरोली राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा आहेत.डॉ. विजय आर्इंचवार. नव्याने स्थापन झालेल्या गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे प्रथम कुलगुरु होण्याचा सन्मान म्हणजे चंद्रपूर- गडचिरोली क्षेत्रात डॉ. विजय आईंचवार दिलेल्या शैक्षणिक सामाजिक कार्याचे फलीत होय. सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर येथील प्राध्यापक पदापासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करुन पुढे कर्तृतत्वाची - उत्तुंग झेप आहे. विद्यापीठातील विविध समित्यांवर त्यांनी मोलाची कामगिरी केली आहे. मनोहर सप्रे. व्यगचित्रकार, काष्ठशिल्पकला, विनोदी लेखन, उत्कृष्ठ वक्तृत्व व दिलखुलास व्यक्तीमत्व म्हणून मनोहर सप्रे महाराष्ट्राला परिचित आहेत. जनता महाविद्यालयात चंद्रपूर येथे बावीस वर्ष ते प्राध्यापक होते. सातत्याने बावीस वर्ष रोज त्यांचे व्यंगचित्र प्रकाशित होत होते. याशिवाय विविध वृत्तपत्रातही त्यांची व्यंगचित्रे प्रकाशित झाली आहेत. त्यांची आठ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. जळावू लाकूड व बांबू यांच्यापासून विविध कलाकृती व शिल्प निर्मिती त्यांनी केली असून फ्रान्स, अमेरिकेसारख्या देशातही त्यांच्या कलाकृतीची प्रदर्शनी भरली आहे. (शहर प्रतिनिधी)