शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना मोफत देणार तुतीची रोपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 23:25 IST

जिल्ह्यात १७ जून ते ३० सप्टेंबर दरम्यान वनमहोत्सव साजरा होणार असून कालावधीत ३३ कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी यंदा प्रथमच शेतकऱ्यांना तुतीची रोपे मोफत देण्याचा निर्णय वनविभागाने घेतला. या निर्णयामुळे जिल्ह्यात रेशीम व्यवसायाला चालणार मिळण्याची आशा निर्माण झाली आहेत.

ठळक मुद्देवृक्ष लागवड मोहीम : तुती लागवडीला मिळणार चालना, वनविभागाचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कचंंद्रपूर : जिल्ह्यात १७ जून ते ३० सप्टेंबर दरम्यान वनमहोत्सव साजरा होणार असून कालावधीत ३३ कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी यंदा प्रथमच शेतकऱ्यांना तुतीची रोपे मोफत देण्याचा निर्णय वनविभागाने घेतला. या निर्णयामुळे जिल्ह्यात रेशीम व्यवसायाला चालणार मिळण्याची आशा निर्माण झाली आहेत.राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून राज्यात वनमहोत्सव राबविण्यात येत आहे. २०१७ पासून ५० कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेण्यात आला. या कार्यक्रमंतर्गत सन २०१९ - २० या वर्षासाठी ३३ कोटी वृक्ष लागवडी उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. खासगी मालकीचे पडिक क्षेत्र, शेतीचे बांध, रेल्वे दूतर्फा, कालवा, रस्ता, सामूहिक पडिक क्षेत्र व गायरान क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्यात आली. याशिवाय सर्वसामान्य शेतकरी व वृक्षप्रेमी नागरिकांना अल्पदरात रोपे उपलब्ध करून देण्यात आले होते. यंदा एक महिन्याच्या रोपाकरिता महोत्सवाच्या कालावधीत प्रति रोप ८ रूपये तर १८ महिन्यांच्या रोपाकरिता ४० रूपये दर आकारण्यात आला आहे. विशेष म्हणजे सामाजिक वनीकरण विभागातर्फे महात्मा राष्टÑीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तुतीची रोपे तयार करण्यात आली. ही रोपे रेशीम विभागाला मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे रेशीम विभागामार्फत या रोपांचा पुरवठा जिल्ह्यातील शेतकºयांना केला जाणार आहे. जिल्ह्यात तुती लागवडीचे क्षेत्र सद्यस्थितीत अतिशय अल्प आहे. या निर्णयामुळे लागवड क्षेत्र वाढू शकेल. याकरिता रेशीम विभाग, सामाजिक वनीकरण व वनविभाग संयुक्त प्रयत्न करीत आहे.जिल्ह्यातील रोपवाटिकेत मुबलक रोपेजिल्ह्यातील सामाजिक संस्था व वृक्ष प्रेमी नागरिकांना ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी होण्यासाठी वनमहोत्सवाच्या कालावधीत वनविभागाकडून रोपांचा पुरवठा केला जाणार आहे. जिल्ह्यातील रोपवाटिकेमध्ये मुबलक प्रमाणात वृक्षांचे संवर्धन करण्यात आले. वनमहोत्सवादरम्यान नागरिकांना सवलतीच्या दरात रोपांचा पुरवठा करण्यात येणार आहे. रोपांचा तुटवडा पडल्यास सामाजिक वनीकरण विभागाकउूनही रोपे उपलब्ध होतील.