शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कार्यालय हलविल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:42 IST

नागभीड : गोसे खुर्द प्रकल्पाच्या भूसंपादन विभागाचे चंद्रपूर येथील कार्यालय गोंडपिपरी येथे हलविल्यामुळे नागभीड, ब्रम्हपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अडचणीत चांगलीच ...

नागभीड : गोसे खुर्द प्रकल्पाच्या भूसंपादन विभागाचे चंद्रपूर येथील कार्यालय गोंडपिपरी येथे हलविल्यामुळे नागभीड, ब्रम्हपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन हे कार्यालय एक तर नागभीड किंवा ब्रम्हपुरी येथे स्थापित करावे नाही तर, चंद्रपूर येथेच या कार्यालयाची पुनर्स्थापना करावी, अशी या भागातील शेतकऱ्यांची मागणी आहे.

गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचा घोडाझरी उपकालवा नागभीड तालुक्यातील मौशी, मेंढा, किरमिटी, कोर्धा, नवेगाव पांडव,तुकूम, पळसगाव, गिरगाव,सावरगाव येथून पुढे गेला आहे. संबंधित विभागाने या उपकालव्यासाठी या गावातील अनेक शेतकऱ्यांची जमीन १० वर्षांपूर्वी संपादित केली होती. त्यावेळी या शेतकऱ्यांना मोबदला देण्यात आला. पण शेकडो शेतकरी आजही मोबदल्यापासून वंचित आहेत. त्यावेळी मिंथूर, नवेगाव पांडव येथील जमीनीस ४८ हजार रूपये दर एकर याप्रमाणे मोबदला दिला होता. हा अल्प मोबदला काही शेतकऱ्यांनी स्वीकारला. तर काही शेतकऱ्यांनी स्विकारला नाही असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान नुकतेच याच विभागाने मिंथूर, नवेगाव पांडव परिसरातील एका शेतकऱ्यांना ४ लाख ६७ हजार रूपये एकर याप्रमाणे मोबदला दिला. शेतकऱ्यांनी हा संदर्भ देऊन राज्य शासनाकडे वाढीव मोबदल्याची मागणी केली. या मागणीचे उत्तर या शेतकऱ्यांना नुकतेच देण्यात आले. दरम्यान या उत्तरानंतर शेतकऱ्यांनी चंद्रपूर येथील कार्यालयात चौकशी केली असता येथील अधिकाऱ्यांनी गोंडपिपरी येथे जाऊन चौकशी करण्याचा सल्ला दिला.

आता या शेतकऱ्यांनी पाठपुरावा करायचा म्हटले तर गोंडपिपरीलाच जावे लागणार आहे. वास्तविक हे कार्यालय पूर्वी चंद्रपूर येथे असल्याने मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी या भागातील शेतकऱ्यांना चंद्रपूर येथे जाऊन पाठपुरावा करणे सोयीचे होते. मात्र हे कार्यालय आता गोंडपिपरी येथे हलविण्यात आल्याने शेतकऱ्यांची अडचण झाली आहे. नागभीड ब्रम्हपुरी तालुक्याच्या दृष्टीने गोंडपिपरी हे ठिकाण गैरसोयीचे आहे. गोंडपिपरी येथे हलविण्यात आलेले कार्यालय शेतकऱ्यांचे आर्थिक व मानसिक छळ करणारे कार्यालय ठरत आहे, असा आरोप शेतकरी करीत आहेत.

कोट

गोंडपिपरी येथे हलविण्यात आलेले हे कार्यालय नागभीड तालुक्यासाठी गैरसोयीचेच नाही तर शेतकऱ्यांचे आर्थिक व मानसिक त्रास देणारे ठरत आहे.नागभीड किंवा ब्रम्हपुरी येथे या कार्यालयाची स्थापना करावी नाही तर चंद्रपूर येथेच या कार्यालयाची पुनर्स्थापना करावी.

-गोपाल शिवणकर , पिडित शेतकरी, मिंथूर.