शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

कार्यालय हलविल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 05:00 IST

गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचा घोडाझरी उपकालवा नागभीड तालुक्यातील मौशी, मेंढा, किरमिटी, कोर्धा, नवेगाव पांडव,तुकूम, पळसगाव, गिरगाव,सावरगाव येथून पुढे गेला आहे. संबंधित विभागाने या उपकालव्यासाठी या गावातील अनेक शेतकऱ्यांची जमीन १० वर्षांपूर्वी संपादित केली होती. त्यावेळी या शेतकऱ्यांना मोबदला देण्यात आला. पण शेकडो शेतकरी आजही मोबदल्यापासून वंचित आहेत. त्यावेळी मिंथूर, नवेगाव पांडव येथील जमिनीला ४८ हजार रूपये दर एकर याप्रमाणे मोबदला दिला होता.

ठळक मुद्देगोंडपिपरीतील कार्यालयाची पूनर्स्थापना हाच पर्याय

  घनश्याम नवघडे    लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : गोसेखुर्द प्रकल्पाच्या भूसंपादन विभागाचे चंद्रपूर येथील कार्यालय गोंडपिपरी येथे हलविल्यामुळे नागभीड, ब्रम्हपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन हे कार्यालय एक तर नागभीड किंवा ब्रम्हपुरी येथे स्थापित करावे नाही तर, चंद्रपूर येथेच या कार्यालयाची पुनर्स्थापना करावी, अशी या भागातील शेतकऱ्यांची मागणी आहे. गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचा घोडाझरी उपकालवा नागभीड तालुक्यातील मौशी, मेंढा, किरमिटी, कोर्धा, नवेगाव पांडव,तुकूम, पळसगाव, गिरगाव,सावरगाव येथून पुढे गेला आहे. संबंधित विभागाने या उपकालव्यासाठी या गावातील अनेक शेतकऱ्यांची जमीन १० वर्षांपूर्वी संपादित केली होती. त्यावेळी या शेतकऱ्यांना मोबदला देण्यात आला. पण शेकडो शेतकरी आजही मोबदल्यापासून वंचित आहेत. त्यावेळी मिंथूर, नवेगाव पांडव येथील जमिनीला ४८ हजार रूपये दर एकर याप्रमाणे मोबदला दिला होता. हा अल्प मोबदला काही शेतकऱ्यांनी स्वीकारला. तर काही शेतकऱ्यांनी स्विकारला नाही असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान नुकतेच याच विभागाने मिंथूर, नवेगाव पांडव परिसरातील एका शेतकऱ्यांना ४ लाख ६७ हजार रूपये एकर याप्रमाणे मोबदला दिला. शेतकऱ्यांनी हा संदर्भ देऊन राज्य शासनाकडे वाढीव मोबदल्याची मागणी केली. या मागणीचे उत्तर या शेतकऱ्यांना नुकतेच देण्यात आले. दरम्यान या उत्तरानंतर शेतकऱ्यांनी चंद्रपूर येथील कार्यालयात चौकशी केली असता येथील अधिकाऱ्यांनी गोंडपिपरी येथे जाऊन चौकशी करण्याचा सल्ला दिला. आता या शेतकऱ्यांनी पाठपुरावा करायचा म्हटले तर गोंडपिपरीलाच जावे लागणार आहे. वास्तविक हे कार्यालय पूर्वी चंद्रपूर येथे असल्याने मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी या भागातील शेतकऱ्यांना चंद्रपूर येथे जाऊन पाठपुरावा करणे सोयीचे होते. मात्र हे कार्यालय आता गोंडपिपरी येथे हलविण्यात आल्याने शेतकऱ्यांची अडचण झाली आहे. नागभीड ब्रम्हपुरी तालुक्याच्या दृष्टीने गोंडपिपरी हे ठिकाण गैरसोयीचे आहे. गोंडपिपरी येथे हलविण्यात आलेले कार्यालय शेतकऱ्यांचे आर्थिक व मानसिक छळ करणारे कार्यालय ठरत आहे, असा आरोप शेतकरी करीत आहेत.   

 गोंडपिपरी येथे हलविण्यात आलेले हे कार्यालय नागभीड तालुक्यासाठी गैरसोयीचेच नाही तर शेतकऱ्यांचे आर्थिक व मानसिक त्रास देणारे ठरत आहे.नागभीड किंवा ब्रम्हपुरी येथे या कार्यालयाची स्थापना करावी नाही तर  चंद्रपूर येथेच या कार्यालयाची पुनर्स्थापना करणे काळाची गरज  झाली आहे.-गोपाल शिवणकर , पीडित शेतकरी, मिंथूर.

टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्प