शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

भूसंपादन कार्यालय हलविल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:42 IST

गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचा घोडाझरी उपकालवा नागभीड तालुक्यातील मौशी, मेंढा, किरमिटी, कोर्धा, नवेगाव पांडव, तुकूम, पळसगाव, गिरगाव, सावरगाव येथून ...

गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचा घोडाझरी उपकालवा नागभीड तालुक्यातील मौशी, मेंढा, किरमिटी, कोर्धा, नवेगाव पांडव, तुकूम, पळसगाव, गिरगाव, सावरगाव येथून पुढे गेला आहे. संबंधित विभागाने उपकालव्यासाठी शेतकऱ्यांची जमीन १० वर्षांपूर्वी संपादित केली होती. काही शेतकऱ्यांना मोबदलाही देण्यात आला. पण शेकडो शेतकरी आजही मोबदल्यापासून वंचित आहेत. त्यावेळी मिंथूर, नवेगाव पांडव येथील जमिनीला ४८ हजारांचा दर प्रति एकरप्रमाणे मोबदला दिला होता. हा अल्प मोबदला काही शेतकऱ्यांनी स्वीकारला तर काहींनी नकार दिला. नुकतेच याच विभागाने मिंथूर, नवेगाव पांडव परिसरातील एका शेतकऱ्याला ४ लाख ६७ हजार रूपये एकर याप्रमाणे मोबदला दिला. शेतकऱ्यांनी हाच पुरावा पुढे करून राज्य शासनाकडे वाढीव मोबदल्याची मागणी केली. या मागणीचे उत्तर शेतकऱ्यांना देण्यात आले. या उत्तरानंतर शेतकऱ्यांनी चंद्रपूर येथील कार्यालयात चौकशी केली असता येथील अधिकाऱ्यांनी गोंडपिपरी येथे जाऊन चौकशी करण्याचा सल्ला दिला. असे प्रकार अन्य प्रकरणांमध्ये घडत असल्याचा शेतक-यांचा आरोप आहे.

बॉक्स

गोंडपिपरी गैरसोयीचे

भूसंपादन कार्यालयाचे पूर्वी चंद्रपूर येथे होते. त्यामुळे न्याय मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना पाठपुरावा करणे सोयीचे होते. मात्र हे कार्यालय गोंडपिपरी येथे हलविण्यात आल्याने शेतकऱ्यांची अडचण झाली आहे. नागभीड व ब्रम्हपुरी तालुक्याच्या दृष्टीने गोंडपिपरी हे ठिकाण गैरसोयीचे आहे.

कोट

गोंडपिपरी येथील कार्यालय गैरसोयीचेच नाही तर शेतकऱ्यांना आर्थिक व मानसिक त्रास देणारे ठरत आहे. त्यामुळे नागभीड किंवा ब्रम्हपुरी येथे हे कार्यालय हलवावे.

- गोपाल शिवणकर, शेतकरी मिंथूर.