शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भवाद्यांच्या आंदोलनाचा डाव उधळला

By admin | Updated: September 21, 2016 00:42 IST

विदर्भ राज्य आंदोलन समितीने ३ सप्टेंबरला मुंबई येथील प्रेस क्लबमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत...

कार्यकर्त्यांना अटक व सुटका : बाळा नांदगावकर यांचा करणार होते निषेधवरोरा : विदर्भ राज्य आंदोलन समितीने ३ सप्टेंबरला मुंबई येथील प्रेस क्लबमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मनसे कार्यकर्त्यांनी अखंड महाराष्ट्राच्या घोषणा देत गोंधळ घातला होता. त्याचे पडसाद विदर्भात पाहावयास मिळाले. ही घटना घडल्यानंतर मंगळवारी मनसे नेते बाळा नांदगावकर हे वणी येथील कार्यक्रमाकरिता वरोरा येथून जाणार असल्याची माहिती विदर्भवाद्यांना कळताच विदर्भवाद्यांचा ताफा रत्नमाला चौकात पोहोचला व काळे झेंडे दाखवून निषेध करण्याच्या तयारीत होते. मात्र पोलिसांनी विदर्भवाद्यांना अटक करून आंदोलनाचा डाव उधळला. स्वतंत्र विदर्भासाठी ३ व ४ आॅक्टोबरला प्रति विधानसभेचे आयोजन करणाऱ्या नागपूरच्या विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या पत्रकार परिषदेत मनसेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याचे पडसाद १४ सप्टेंबरला वरोरा शहरातही दिसून आले. वरोरा येथील सद्भावना चौकात काळ्या फिती लावून मनसेचा झेंडा जाळून निदर्शने देत निषेध नोंदविण्यात आला होता. त्याच्या प्रतिउत्तरात मनसेचे तालुकाध्यक्ष मनीष जेठानी यांनी मनसेच्या झेंड्यावर अखंड महाराष्ट्र, असा लिहिलेल्या झेंडा डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात झेंडा फडकविला होता. मंगळवारी मनसेचे नेते माजी आमदार बाळा नांदगावकर हे वणी येथे आयोजित शेतकरी मार्गदर्शन शिबिर व कार्यकर्ता मेळाव्याला वरोरा येथून जात असल्याचे विदर्भवाद्यांना कळताच विदर्भ राज्य आंदोलन समितीचे कोर कमेटी सदस्य अ‍ॅड. मोरेश्वर टेमुर्डे यांच्या नेतृत्वात बाळा नांदगावकर यांना काळे झेंडे दाखवून मुंबई येथील घटनेचा निषेध करण्याची तयारी होती. पोलिसांना आंदोलनाची भनक लागताच वरोरा पोलिसांनी कोर कमेटी सदस्य अ‍ॅड. मोरेश्वर टेमुर्डे, युवा आघाडी जिल्हा सचिव आशिष घुमे, वरोरा तालुका अध्यक्ष सुधाकर जीवतोड यांना अटक करून काही वेळानंतर त्यांची सुटका केली. त्यामुळे विदर्भवाद्यांचे आंदोलन पूर्ण होऊ शकले नाही. (शहर प्रतिनिधी)विदर्भ राज्याला विरोध नाहीबाळा नांदगावकर यांनी मनसे वरोरा तालुका कार्यालयाला भेट दिली व वेगळ्या विदर्भाबाबत बोलताना, सामान्य जनतेला वेगळा विदर्भ पाहिजे असेल तर त्या विषयी आमचे काहीच म्हणणे नाही. मात्र मूठभर लोकांना जर वेगळा विदर्भ हवा असेल तर आमची अखंड महाराष्ट्राची भूमिका कायम राहणार आहे, अशी प्रतिक्रीया दिली.