शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

मोबदल्यासाठी पोवनी कोळसा खाणींच्या प्रकल्पग्रस्त शेतकºयांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 23:53 IST

राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्राअंतर्गत नव्याने सुरू झालेली पोवनी-२ कोळसा खाण प्रकल्पग्रस्त शेतकºयांनी मंगळवारी सकाळी ११ वाजता बंद पाडली.

ठळक मुद्देबेमुदत उपोषण सुरू : वेकोलिची पोवनी-२ कोळसा खाण पाडली बंद

लोकमत न्यूज नेटवर्कसास्ती : राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्राअंतर्गत नव्याने सुरू झालेली पोवनी-२ कोळसा खाण प्रकल्पग्रस्त शेतकºयांनी मंगळवारी सकाळी ११ वाजता बंद पाडली. आपल्या हक्काच्या मोबदल्यासाठी व इतर मागण्यांकरिता प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन सुरू केले असून खाणीसमोर मंगळवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्राअंतर्गत विविध नव्या कोळसा खाणीकरिता परिसरातील साखरी, पोवनी, वरोडासह इतर गावातील सुपिक जमिनीचे अधिग्रहण सुरू आहे. पोवनी २ व ३ या कोळसा खाणीकरिता पोवनी, साखरी, वरोडा येथील शेतकºयांना शेतजमिनी २७ नोव्हेबर २०१५ रोजी वेकोलि प्रशासनाने सेक्शन ११ लावून अधिग्रहीत करणे सुरू केले. आॅक्टोबर २०१६ पासून पोवनी-३ प्रकल्पग्रस्तांचे अ‍ॅग्रीमेंट सुरू केले. परंतु, अजूनही प्रकल्पग्रस्तांना मोबदला मिळालेला नाही. मात्र २४ सप्टेंबरला साखरी येथे वेकोलि प्रशासनाच्या अधिकाºयांनी पोवनी-३ च्या प्रकल्पग्रस्त शेतकºयांची बैठक घेऊन प्रकल्पग्रस्त शेतकºयांना २०१३ च्या नव्या कायद्यानुसार अधिग्रहणाचा दर कमी झाला असून तो २ ते ३ लाख रुपये प्रती एकरी दिला जाईल, अशी माहिती दिली. त्यावर प्रकल्पग्रस्त शेतकºयांनी हा दर मान्य नसून आम्ही आमच्या जमिनी वेकोलिला देणार नाही, असा इशारा दिला. त्यानंतर प्रकल्पग्रस्त शेतकºयांनी आंदोलनाचा इशाराही दिला. परंतु, वेकोलि प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले.दरम्यान, मंगळवारी प्रकल्पग्रस्त शेतकºयांनी आंदोलन सुरू करून साखरी येथील हनुमान मंदिरातून रॅली काढून वेकोलिच्या पोवनी-२ ही खाण सकाळी ११ वाजताच्या सुमारास बंद पाडली. त्यानंतर खाणीसमोरील रस्त्यावर बेमुदत उपोषण सुरू केले. उपोषणस्थळी वेकोलिचे अधिकारी मनोज नवले, रमेशसिंग यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेत मुख्य महाप्रबंधकांशी चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिलेया आंदोलनात सरपंच भाऊ कोडापे, अमोल घटे, धर्मराज उरकुडे, खुशाब पोडे, विजय काटवले, शेषराव बोंडे, उत्तम बोबडे, अरुण उरकुडे, मारोती उरकुडे, अविनाश देठे, विनोद गालफाडे, नरेश लांडे, संदिप बोढे, विनोद कावळे, शैलेश गंपावार, व्यंकन्ना, चंद्रकांत लेडांगे, जितू उमरे यांच्या सह शेकडो प्रकल्पग्रस्त शेतकरी सहभागी होते.