शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

मनपा सफाई कामगारांचे आंदोलन न्यायपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 22:07 IST

चार दिवसांपासून सुरू असलेल्या स्वच्छता कामगारांच्या आंदोलनाकडे मनपा पदाधिकारी व अधिकारी डोळेझाक करीत आहेत. कामगारांचे आंदोलन न्यायपूर्ण असल्याने मागण्या मान्य करण्याची मागणी माजी खासदार नरेश पुगलिया यांनी केली. शनिवारी आंदोलनस्थळी भेट घेऊन कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या. मनपाकडून कंत्राटदाराला ५८० रूपये दिले जाते. परंतु कामगारांना फक्त २५६ रूपये देण्यात येते, असा आरोपही त्यांनी केला.

ठळक मुद्देनरेश पुगलिया : सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चार दिवसांपासून सुरू असलेल्या स्वच्छता कामगारांच्या आंदोलनाकडे मनपा पदाधिकारी व अधिकारी डोळेझाक करीत आहेत. कामगारांचे आंदोलन न्यायपूर्ण असल्याने मागण्या मान्य करण्याची मागणी माजी खासदार नरेश पुगलिया यांनी केली. शनिवारी आंदोलनस्थळी भेट घेऊन कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या. मनपाकडून कंत्राटदाराला ५८० रूपये दिले जाते. परंतु कामगारांना फक्त २५६ रूपये देण्यात येते, असा आरोपही त्यांनी केला.दुपारी ३ वाजता माजी खासदार पुगलिया यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. कामगारांच्या सर्व मागण्या कायद्याला अनुसरून असल्याने या आंदोलनाला सक्रीय पाठींबा देत असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. सोमवारी १२ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलनकर्त्याचा धडक मोर्चा आयोजित करण्यात आला. जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांना आंदोलनकर्ते विविध मागण्यांचे निवेदन सादर करणार आहेत. यानंतरही आंदोलनकर्त्यांनी बेमुदत साखळी उपोषण सुरूच ठेवणार आहेत, याकडेही माजी खा. पुगलिया यांनी लक्ष वेधले. कामगारांनी तर मनपाच्या अन्यायाचाच पाढा वाचला.यावेळी चंद्रपूर शहर महानगरपालिकाचे काँँग्रेसचे गटनेता डॉ. सुरेश महाकुलकर, चंद्रपूर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष गजाननराव गावंडे, चंद्रपूर जिल्हा काँँग्रेसचे महासचिव अ‍ॅड. अविनाश ठावरी, इंटकचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर पोडे, नगरसेवक प्रशांत दानव, अशोक नागापूरे, नगरसेवक प्रवीण पडवेकर, युवक काँंग्रेसचे पंकज गुप्ता व शेकडो कार्यकर्ते, कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.आंदोलनस्थळी कामगारांसह फराळ दिवाळीकिमान वेतनासह विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी महानगर पालिकेच्या सफाई कामगारांनी कामबंद आंदोलन पूकारले आहे. त्यांच्या आंदोलनाचा शनिवारी चौथा दिवस असला तरी मागण्यांची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे कामगारांची दिवाळी अंधारात गेली आहे. दरम्यान, किशोर जोरगेवार यांनी आज आंदोलनस्थळी भेट देऊन कामगारांसोबत फराळ करत दिवाळी साजरी केली. कामगारांची दिवाळी अंधारमय करत स्वत:ची दिवाळी उत्साहात साजरी करणाऱ्यांच्या जीवणात कधीच प्रकाश येणार नाही, असे वक्तव्यही यावेळी जोरगेवार यांनी केले. कामगारांच्या मागण्या तत्काळ सोडविण्याची मागणी केली. कामगारांच्या आंदोलनाने शहरात साचलेल्या घाणीमुळे सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. याचा मोठा विपरीत परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होण्याची शक्यताही जोरगेवार यांनी वर्तविली. कामगार बेमुदत उपोषणावर पूर्णत: ठाम आहेत. यावेळी विनोद अंनतावार, सुनिल पाटील, वंदना हातगावकर, संतोषी चौव्हाण, सुजाता बल्ली, राजेश मंगळूरकर, संजय मेश्राम, पुण्यवर्धन मेश्राम आदी उपस्थित होते.