शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

कोरपना तालुक्याच्या विभाजनाच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 00:27 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्याच्या विभाजनाच्या हालचाली प्रशासकीय स्तरावर सुरू झाल्या आहेत. कोरपना तालुक्याचे विभाजन करून गडचांदूर या नव्या तालुक्याची निर्मिती करण्यासंबंधीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांनी बुधवारी विभागीय आयुक्तांकडे पाठविला आहे.

ठळक मुद्देगडचांदूर होणार तालुका : जिल्हाधिकाऱ्यांनी पाठविला विभागीय आयुक्तांना प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्याच्या विभाजनाच्या हालचाली प्रशासकीय स्तरावर सुरू झाल्या आहेत. कोरपना तालुक्याचे विभाजन करून गडचांदूर या नव्या तालुक्याची निर्मिती करण्यासंबंधीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांनी बुधवारी विभागीय आयुक्तांकडे पाठविला आहे.चंद्रपूर मुख्यालयापासून कोरपना हे ७० किलोमीटर अंतरावर आहे. माणिकगड, अल्ट्राटेक, कोळसा खाणी यासारखे उद्योग या तालुक्यात आहेत. याशिवाय अनेक गावेही या तालुक्यात समाविष्ट आहे. कोरपना तालुक्यातील गडचांदूर हे शहर औद्योगिकदृष्टया विकसित आहे. उद्योगांमुळे हे शहर चांगलेच परिचित झाले आहे. दरम्यान, १६ जानेवारी २०१६ मध्येच तत्कालीन जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी कोरपना तालुक्याचे विभाजन करून गडचांदूर या नव्या तहसीलची निर्मिती करण्याबाबत प्रस्ताव विभागीय आयुक्त नागपूर यांच्याकडे पाठविला होता. या प्रस्तावाचे अवलोकन करून विभागीय आयुक्तांनी प्रस्तावात काही त्रुट्या अधोरेखित केल्या होत्या. त्या संदर्भातील पत्र जिल्हाधिकाºयांना पाठविले होते.त्यानंतर राजुरा येथील उपविभागीय अधिकारी आणि आस्थापना शाखेतील प्रभारी अधिकारी यांना त्रुट्यावरील मुद्यांवर माहिती मागविण्यात आली. त्यांच्याकडून माहिती प्राप्त झाल्यानंतर त्रुट्याविरहित प्रस्ताव जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांनी बुधवारी विभागीय आयुक्त नागपूर यांना पाठविला आहे. विभागीय आयुक्तांकडून हा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठविला जाणार आहे. शासनाने मंजुरी दिल्यास चंद्रपूर जिल्ह्यात गडचांदूर या नव्या तालुक्याची निर्मिती होऊन १६ तालुके अस्तित्वात येईल. विशेष म्हणजे, नव्या तालुक्यापासून महसुली मंडळाचे अंतर, प्रवाशांना लागणारा वेळ व उपलब्ध प्रवासांची साधने याबाबींचा प्रस्तावात समावेश करण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्हा मुख्यालयापासून गडचांदूरचे अंतर ५० किलोमीटर असल्याचेही प्रस्तावात नमूद केले आहे.असे असणार क्षेत्रफळसध्या कोरपना तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रफळ ५७ हजार ८० हेक्टर आर आहे. यातून प्रस्तावित गडचांदूर तालुक्यात समाविष्ट करावयाचे क्षेत्रफळ २४ हजार ४१४ हेक्टर आर असणार आहे. तसे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. कोरपना तालुक्यातील कोरपना मंडळात गावांची संख्या ६८ आहे. तर गडचांदूर महसूल मंडळात ४५ गावे आहेत.न.प. व ग्रा.पं. ची संख्याकोरपना तालुक्यात एक नगर परिषद, एक पंचायत समिती (कोरपना), एक नगरपंचायत (कोरपना) व ग्रामपंचायतीची संख्या ५२ आहे. या तालुक्याचे विभाजन झाल्यास प्रस्तावित गडचांदूर तालुक्यात एक नगरपरिषद (गडचांदूर), एक पंचायत समिती (गडचांदूर प्रस्तावित) आणि ग्रामपंचायतींची संख्या २२ असणार आहे.अशी असणार लोकसंख्यासध्या कोरपना तालुक्याची लोकसंख्या एक लाख २५ हजार ३१७ एवढी आहे. पाच कनिष्ठ महाविद्यालये आहेत. पाच आरोग्य केंद्रे आहेत. याशिवाय दोन पोलीस स्टेशन आहे. विभाजन झाल्यास प्रस्तावित गडचांदूर तालुक्याची लोकसंख्या ७६ हजार ३९५ असेल. याशिवाय दोन कनिष्ठ महाविद्यालये, तीन आरोग्य केंद्रे व एक पोलीस ठाणे असणार आहे. तसे जिल्हाधिकारी यांनी पाठविलेल्या प्रस्तावात नमूद आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी