शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

पंचायत समितीस्तरावर सभापतीपदासाठी हालचाली

By admin | Updated: September 2, 2014 23:38 IST

जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्ह्यातील १५ पंचायत समितीमधील कार्यरत सभापती व उपसभापतीपदाचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपत आल्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार

बल्लारपूर : जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्ह्यातील १५ पंचायत समितीमधील कार्यरत सभापती व उपसभापतीपदाचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपत आल्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार सभापती व उपसभापतीपदाची निवड करण्यासाठी १४ सप्टेंबरला निवडणूक होऊ घातली आहे. यामुळे पंचायत समितीस्तरावर सभापतीपदासाठी हालचालींना चांगलाच वेग घेतला आहे. मागीलवेळी अडीच वर्षासाठी सभापती व उपसभापतीपदाची निवड १४ मार्च २०१२ रोजी करण्यात आली होती. त्याचा कार्यकाळ १४ सप्टेंबरला पूर्ण होत आहे. त्यामुळे निवडणूक कार्यक्रम घोषित होताच, ग्रामीण भागातील राजकारण ढवळून निघत आहे. राजकीय पक्षांनी आपल्याच पक्षाचे सभापती व उपसभापती विराजमान करण्यासाठी तडजोडीचा मार्ग अवलंबविण्यास सुरुवात केली आहे. एकूण १५ पंचायत समिती असून तब्बल आठ पंचायत समितीमध्ये महिला सभापती होण्याचा मान मिळणार आहे.जिल्ह्यातील चिमूर (अनुसूचित जाती), गोंडपिंपरी व राजुरा (अनुसूचित जमाती), वरोरा व बल्लारपूर (नागरिकांचा मागास प्रवर्ग), भद्रावती, नागभीड व सिंदेवाही सर्वसाधारण वर्ग या आठ पंचायत समित्यांवर महिलांना सभापतीपदाची संधी मिळण्याचा मार्ग आरक्षणामुळे मोकळा झाला आहे. ब्रह्मपुरी येथे अनुसूचित जाती, मूल अनुसूचित जमाती, जिवती व पोंभूर्णा नागरिकांचा मागास प्रवर्ग, चंद्रपूर, सावली व कोरपना येथे सभापती पदाचे आरक्षण सर्वसाधारण असे आहे. या सात पंचायत समितीमध्ये पुरुष मंडळी सभापती पद बळकावण्यासाठी मोर्चेबांधणीला लागले आहेत.चंद्रपूर पंचायत समितीमध्ये १२, भद्रावती ८, चिमूर १२, वरोरा ८, ब्रह्मपुरी ८, नागभीड १०, सिंदेवाही ८, मूल ६, सावली ८, पोंभूर्णा ४, गोंडपिंपरी ६, राजुरा ८, कोरपना ८, जिवती व बल्लारपूर ४ पंचायत समिती मध्ये पंचायत समितीचे सदस्य आहेत. आजघडीला काँग्रेसचे सभापती बल्लारपूर, कोरपना, गोंडपिंपरी, सिंदेवाही, नागभीड व वरोरा या सहा पंचायत समित्या काँग्रेसच्या ताब्यात आहेत. चंद्रपूर, ब्रह्मपुरी, मूल, पोंभूर्णा व जिवती पंचायत समितीवर भाजपाचे सभापती आहेत. मनसकडे भद्रावती, युवाशक्ती संघटनेकडे चिमूर, राष्ट्रवादीकडे सावली व शेतकरी संंघटनेकडे राजुरा पंचायत समितीचे सभापती आहेत.आगामी पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतीच्या निवडणुकीत कोणत्या राजकीय पक्षाकडे राहतील. याकडे ग्रामीण भागातील जनतेचे लक्ष लागले आहेत.(शहर प्रतिनिधी)