शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस पथक ‘सेटिंग’च्या मोहात

By admin | Updated: August 28, 2015 01:19 IST

जिल्ह्यात दारुबंदी झाल्यानंतर प्रत्येक ठाण्यातील पोलिसांनी अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर व पिणाऱ्यांवर आळा घालण्यासाठी सतर्क राहावे,

दारूविक्रेत्यांना सहकार्य? : नागरिकांत रोष, तक्रार करायची कुणाकडे ? शंकर चव्हाण  जिवतीजिल्ह्यात दारुबंदी झाल्यानंतर प्रत्येक ठाण्यातील पोलिसांनी अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर व पिणाऱ्यांवर आळा घालण्यासाठी सतर्क राहावे, असे जिल्हा पोलीस विभागाचे आदेश आहेत. मात्र जिवती पोलीस दारू विक्रेत्यांकडून स्वत:चे चांगभलं करण्यासाठी दारूविक्री व आयात करण्यासाठी सहकार्य करीत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. त्यामुळे अनेकाचे संसार उघड्यावर येण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.जिवती तालुका हा तेलंगणा राज्यालगत असल्याने येथून मोठ्या प्रमाणात दारूची हेराफेरी होत आहे. तर काही जण केरामेरी, इंदाणी, कोलामा, मेडीगुडा आदी ठिकाणावर जावून आपली तलफ भागवित आहे. या दारूविक्रीवर आळा घालण्यासाठी नेहमी पोलीस गस्तीवर असतात. मात्र दारूपिणारा व विकणारा गस्तीतल्या पोलिसांच्या ओळखीचा सापडला की, सेटींग करायलाही वेळ लागत नाही. मग दारू कितीही सापडू द्या, थोडीफार दारू दाखवून त्यांच्यावर कार्यवाही करण्याचा जिवती पोलिसांचा सपाटा सुरु आहे. अनेक वेळा दारू सापडूनही काहीच हाती लागले नाही, असे सांगून परत केल्याचे नागरिकांकडून कळते. गावात एखाद्याने पोलिसांनी दारू पकडून सोडल्याची बोंब केली की त्यालाही धमकावून गप्प बसविण्याचा प्रकार घडत असल्याची माहिती समोर येत आहे.पैसे कमविण्याच्या मोहात पडलेले पोलीस कर्मचारी सर्वसामान्य नागरिकांचा कसलाही विचार न करता ‘आम्ही जातो, तुम्ही चालवा’ अशी हिरवी झेंडीच दाखविल्याचे चित्र तालुक्यात आहे. त्यामुळे दारू विक्रेतेही बिनधास्तपणे दारू विक्री करीत आहेत. जिल्ह्यात दारूबंदी झाल्यानंतर अवैध दारू विक्रीवर आळा घालण्याची जबाबदारी पोलिसांवर असतानाही पोलीस सुस्त का आहेत, पोलिसांना मिळालेली गुप्त माहिती दारूविक्रेत्यांपर्यंत पोहोचते कशी, हा सर्व प्रकार पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. याकडे एसपींनी लक्ष द्यावे.