शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

अन् मुलगी झाली ‘आईची आई’ !

By admin | Updated: October 26, 2014 22:37 IST

‘त्या’ आईने आपल्या बाळावर जिवापाड प्रेम केलं. काळजी घेतली. तिला लहानाचं मोठं केलं. अठराविश्व दारिद्र्य असल्याने दु:खही भोगले. आज ही आई १०२ वर्षाची झाली आहे. ना चालता येतं, ना स्पष्ट दिसतं,

ममतेची महतीच मोठी : कोकेवाडा येथील मायलेकींचं कुटुंबसचिन सरपटवार - भद्रावती‘त्या’ आईने आपल्या बाळावर जिवापाड प्रेम केलं. काळजी घेतली. तिला लहानाचं मोठं केलं. अठराविश्व दारिद्र्य असल्याने दु:खही भोगले. आज ही आई १०२ वर्षाची झाली आहे. ना चालता येतं, ना स्पष्ट दिसतं, ना ऐकायला येतं ! खाटेवरच तिचा दिवस उगवतो अन् खाटेवरच रात्रही होते. आता या आईची मुलगीही मोठी झाली. तिचे लग्नही झाले. म्हाताऱ्या आईची काळजी घ्यायला कुणी नाही म्हणून घरजावई घरात आणला. पण तोही सोडून गेला. मुलगी मात्र आईच्या सेवेसाठी तिथेच राहिली. आई जशी आपल्या लहान मुलाची काळजी घेते, तशीच काळजी ही मुलगी आपल्या आईची घेत आहे. आपलं संपूर्ण तारुण्य आईच्या सेवेत घालवत ती मुलगी आपल्या आईची ‘आई’ झाली आहे. भद्रावती तालुक्यातील कोकेवाडा (तु.) या गावात या मायलेकींचे वास्तव्य आहे.सखुबाई लक्ष्मण तुराणकर हे म्हाताऱ्या आईच नाव. सखुबाईनी आज वयाची शंभरी पार केली. गावातील लोकांचे कपडे धुवून त्या आपला उदरनिर्वाह करीत होत्या. त्यांना तीन मुली. दिवसभर काबाडकष्ट करून सखुबार्इंनी तिनही मुलींचे लग्न केले. लग्न झाल्यावर आईची काळजी घ्यायला कुणीही नाही हे पाहून तिसऱ्या क्रमांकाची मुलगी अनुसया हिच्यासाठी घरजावई शोधण्यात आला. या तिसऱ्या मुलीचे नाव अनुसया भोसकर (६०) आहे. ती सध्या आपल्या आईची सेवा करीत आहे.सखुबाई अत्यंत दारिद्र्य अवस्थेत आपले जीवन जगत आहे. त्यांना ना स्वत:च्या मालकीचे घर आहे ना घरकुल. शासकीय योजनांपासून त्या वंचित आहेत. श्रावणबाळ योजनेतून त्यांना ६०० रुपये महिना मिळत होता. तोही आता बंद झाला आहे. त्यांची मुलगी अनुसया भोसकर यांनाही काही तांत्रिक कारणांमुळे कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. ‘त्याग’ काय असतो याचा अर्थ अनुसायाच्या रुपाने सर्वसामान्यांसमोर आला. आईची सेवा करायला कोणी नाही म्हणून घर जावयासोबत त्यांनी लग्न केले. घरजावई सोडून गेल्यावर त्या तिथेच आईजवळ राहिल्या. पुन्हा विवाह करण्याचा विचारही त्यांनी मनात आणला नाही.आईची सेवा हेच आपले कर्तव्य समजून त्या सखुबार्इंची काळजी घेत आहे. सकाळी उठून आईचे अगदी केस विंचरण्यापासून तर रात्री जेऊ घालण्यापर्यंतची कामे त्या करीत आहेत. घरोघरी कपडे धुण्याचे काम करुन त्या आपला उदरनिर्वाह करीत आहे.