शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पोरक्या वासराला तिने दिले मातृत्व!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 13:30 IST

गायीने एका वासराला जन्म दिला आणि जन्म देताच तिचा मृत्यू झाला. तिचे अभागे वासरू जन्मताच आईविना पोरके झाले. पण, एका दुसºया गायीने त्या वासराला जवळ केले आणि तिने त्याला मातृत्वाची उब दिली. ती त्याला आपल्या पोटच्या पोटाप्रमाणे दुध देते, त्याला जिभेने चाटून आईचे प्रेम आणि वात्सल्य देते.

ठळक मुद्देमुक्या प्राण्यांमध्येही परोपकाराची भावना

वसंत खेडेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : गायीने एका वासराला जन्म दिला आणि जन्म देताच तिचा मृत्यू झाला. तिचे अभागे वासरू जन्मताच आईविना पोरके झाले. पण, एका दुसºया गायीने त्या वासराला जवळ केले आणि तिने त्याला मातृत्वाची उब दिली. ती त्याला आपल्या पोटच्या पोटाप्रमाणे दुध देते, त्याला जिभेने चाटून आईचे प्रेम आणि वात्सल्य देते.ही कथा आहे गावठी एक महिन्याचे वासरू व त्याला प्रेम देणाºया जर्सी जातीच्या गायीची! त्याचे झाले असे, मोकाट जनावर म्हणून बल्लारपूर नगर परिषदेच्या कांजी हाऊसच्या कर्मचाºयांनी गाभण असलेल्या देशी गायीला कांजीत कोंडले. या कांजीत त्या गायीची प्रकृती बिघडली आणि त्याच अवस्थेत एका वासराला जन्म देऊन ती लगेचच मरण पावली. नगर परिषद कर्मचाºयांनी त्या गायीची सद्गति केली. आता उरला प्रश्न, त्या वासराचे करायचे काय? त्याला कुठे ठेवायचे आणि पोसायचे कुणी? असा पेच निर्माण झाल्यावर त्यावर तोडगा निघाला. येथील किल्ला वॉर्डातील, वर्धा नदी काठावर शेती असलेले आणि दुग्ध व्यवसाय करणारे राजकुमार शर्मा यांच्याकडे ते वासरू आणून न.प. कर्मचाºयांनी दिले. शर्मा यांच्याकडे गायी व म्हशी अशी दुभती जनावरे खूप आहेत. त्यातील एक महिन्याचे वासरू असलेल्या दुभत्या जर्सी जातीच्या गायीजवळ त्या वासराला दूध प्यायला नेले. परंतु परका म्हणून गायीने त्या वासराला झिडकारले. तरीही, प्रयत्न म्हणून शर्मा यांनी परत वासराला दोन तिनदा तिच्याकडे नेले आणि तिसºया खेपेला त्या गायीने वासराला आपल्याजवळ करून त्याला आपले दूध दिले व जिभेने त्याला चाटून ममत्त्वाने प्रेमही दिले. पोटच्या लेकराप्रमाणे ती त्याला आता रोज दूध देते.त्याला चाटून त्याची ती आपल्या पद्धतीने खबरबात घेते. तो दिसला नाही की, ती त्याच्याकरिता हंबरतेही! तिचे स्वत:चे दोन महिन्यांचे वासरू आहे. या परक्या एक महिन्याच्या वासरावरही तिचा तेवढाच जीव जडला आहे. ही गाय लाल रंगाची, तिचे स्वत:चे वासरूही त्याच रंगाचे! ते अभागे वासरू पांढºया रंगाचे! गाय जर्सी, ते वासरू गावठी. जात वेगळी, रंग वेगळा! तरीही, दोघांमध्ये भरपूर ममत्व! प्राण्यामध्येही परोपरकाराची भावना असते, हेच यावरून आढळते.