लोनवाही शहरात एकूण चार वाॅर्ड आहेत. निवडणूक प्रतिष्ठेची असल्याने चार वॉर्डांमध्ये ११ सदस्यांची निवड करण्यात येणार आहे . शहरातील प्रचार बंद झालेला असून गुप्त भेटी घेणे सुरू आहे . शहरातील
गावाचे सर्वांगीण विकासाचे मुद्दे मांडून सुरक्षित मतदार संघ म्हणून हमखास निवडून येण्यासाठी या चार वॉर्डातील उमेदवार नशीब अजमावीत आहेत. हायटेक प्रचारात आघाडी व खरी लढत दिसून येत असल्याचे चित्र मतदारांना व जनतेला पहायला मिळत आहे . सुशिक्षित उमेदवारांना संधी मिळेल काय,कोण खरी बाजी मारून विजयाची माळ आपल्या गळ्यात घालतो, हे येणाऱ्या निवडणूक निकालानंतरच दिसून येणार आहे . सरपंच आरक्षण नसल्याने उमेदवार व मतदारांमध्ये चुरस निर्माण झालेली दिसत आहे.