बाबुराव परसावार सिंदेवाहीसिंदेवाही पोलीस ठाण्याची स्थापना सन १९२४ मध्ये ब्रिटिशकाळात झाली. तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अहोरात्र प्रयत्न करतात. या पोलीस ठाण्यांतर्गत नवरगाव येथे पोलीस चौकी आहे. सिंदेवाही पोलीस ठाण्यांतर्गत ७४ गावांचा समावेश आहे. तालुकांतर्गत मोहाळी (नलेश्वर), शिवाणी, पळसगाव जाट ही मोठी लोकसंख्या असलेली गावे आहेत. सिंदेवाही तालुका हा जंगलव्याप्त आहे. त्यामुळे वन्यप्राण्याच्या हल्ल्याने सिंदेवाही तालुका बेजार आहे. तालुक्यातील नवेगाव (लोनखैरी) येथील दोन मुलीचे राजस्थानात झालेले अपहरण ही या वर्षाची सिंदेवाही तालुक्यातील मोठी घटना आहे.अल्पवयीन मुली पळविणारी टोळी जेरबंदनवेगाव (लोनखैरी) येथील दोन मुलींना पळवून त्यांची विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला सिंदेवाही पोलिसांनी अटक केली.नवेगाव येथील दोन मुली २७ आॅक्टोबर २०१४ ला घरुन निघून गेल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी पोलिसांकडे केली. लगेच पोलीस निरीक्षक अशोक साखरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने मुलीजवळील मोबाईलच्या माध्यमातून टॉवर लोकेशन घेतले. अधिक तपास केले असता, दोन्ही मुली राजस्थानातील जयपूर जिल्ह्यातील पावटा या गावी असल्याची माहिती मिळाली. येथील पोलीस पथक व स्थानिक पोलिसांच्या मदतीने पावटा या गावी धाड टाकली. तेथे या दोन्ही मुली सापडल्या. त्यांपैकी एका मुलीचा एक लाख रुपयांमध्ये सौदा करून जयपूर येथील एका युवकाशी जबरदस्तीने विवाह लावून दिला. सिंदेवाही पोलीस पथकाने राजस्थानात जावून आंतरराज्यीय टोळीला जेरबंद केले. ५० किलोमीटर चौरस क्षेत्र सिंंदेवाही पोलीस ठाण्याअंतर्गत ७४ गावांचा समावेश आहे. या पोलीस ठाण्याचे ५० चौरस किलो मिटर क्षेत्र आहे. तालुक्यातील कारवा, पांढरवाणी, सिंगडझरी, शिवणी ही गावे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागून आहेत. ही गावे अतिशय घनदाट जंगलात वसलेली आहेत. या परिसरात वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या घटना सातत्याने घडत असतात. तालुक्यातील धार्मिक स्थळेसिंदेवाही पोलीस ठाण्यांतर्गत २० मंदिरे, चार मस्जीद, महापुरुषांचे ३६ पुतळे आहेत. मिनघरी टेकडीवर शिवमंदिर आहे. सिंदेवाहीत महालक्ष्मी देवस्थान, नलेश्वर येथे दर्गा आहेत. सिंदेवाही तालुका झाडीपट्टीतील शंकरपट व नाटकासाठी चंद्रपूर जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. दरवर्षी जानेवारी महिन्यात या तालुक्यात शंकरपटाला सुरुवात होते. पण यावर्षी शंकरपटावर बंदी असल्यामुळे शंकरपट भरविण्यात आले नाही.नवरगाव येथे ठाण्याची आवश्यकताया तालुक्यातील नवरगाव हे गाव २० हजार लोकसंख्येचे गाव आहे. येथे पोलीस चौकी कार्यरत आहे. पोलीस चौकीत एक सहाय्यक पोलीस निरीक्षक व पाच कर्मचारी कार्यरत आहेत. या गावातील नागरिकांनी येथे पोलीस ठाण्याची निर्मिती व्हावी ही मागणी अनेक वर्षांपासून करीत आहे. पण महाराष्ट्र शासनाचे या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे.
महिलांवरील अत्याचाराच्या घटना अधिक
By admin | Updated: February 11, 2015 01:15 IST