शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
2
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
3
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
4
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
5
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
6
वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  
7
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
8
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
9
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
10
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
11
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
12
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!
13
लगाव बत्ती: 'राजे'नीती! रॉयल फॅमिली आणि शिवकालीन गनिमी कावा
14
RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं
15
IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...
16
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
17
धबधबे, बोटिंग आणि निसर्ग सौंदर्य; कांडवनला वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी   
18
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
19
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
20
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट

मंगळवार ठरला ‘मोर्चा’ वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 22:35 IST

कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर आणि प्रकल्पग्रस्तांनी विविध प्रलंबित समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी चंद्रपुरात महाराष्ट्र राज्य किसान सभा, पोंभुर्णा येथे गोंडवाना गणतंत्र पार्टी आणि चिमूर येथे वन विभागाच्या अन्यायाविरूद्ध नागरिकांची मोर्चा काढला.

ठळक मुद्देप्रलंबित मागण्यांकडे वेधले लक्ष : चंद्रपूर, पोंभूर्णा, चिमूर येथे घोषणाबाजी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर आणि प्रकल्पग्रस्तांनी विविध प्रलंबित समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी चंद्रपुरात महाराष्ट्र राज्य किसान सभा, पोंभुर्णा येथे गोंडवाना गणतंत्र पार्टी आणि चिमूर येथे वन विभागाच्या अन्यायाविरूद्ध नागरिकांची मोर्चा काढला. मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्यांची दाहकता वाढत असताना प्रशासनाकडून दुर्लक्ष केल्या जात आहे, असा आरोप मोर्चेकऱ्यांनी केला. दरम्यान, सरकारविरूद्ध घोषणा देऊन शहर दणाणून सोडले. समस्या सोडविल्या नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही मोर्चेकºयांनी दिला आहे.शेत जमिनीचे पट्टे द्याचंद्रपूर : शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्यावी, सर्व जबरान जोतधारकांना शेतजमीन व घराचे पट्टे वाटप करून वैयक्तिक सातबारा द्यावा, वनहक्क अधिकार कायद्यात गैरआदिवासींकरिता असलेल्या तीन पिढ्यांची अट रद्द करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेने आझाद बगिचापासून मोर्चा काढला. हा मोर्चा जटपुरा गेटजवळ पोहोचल्यानंतर पोलिसांनी अडविले. त्यामुळे तब्बल अर्धा तास ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर प्रशासनाने मोर्चेकºयांशी चर्चा करण्याची तयारी दर्शविली. शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांच्याकडे १९ मागण्यांचे निवेदन सादर केले. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या कुटुंबीयांच्या वारसांना ५० लाखांची मदत द्यावी, ६० वर्षांवरील शेतकरी, शेतमजूर, ग्रामीण कारागीर व असंघटीत कामगारांना मासिक ४ हजार रूपये पेंशन देण्याचा कायदा करावा, डॉ. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करून शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव द्यावा, पिकविमा योजनेचा वापर कंपन्यांऐवजी शेतकरी हितासाठी करावा, शेतकºयांना विमा भरपाई द्यावी आदी मागण्यांचा समावेश होता. मोर्चेकºयांच्या वतीने किसान सभेचे राष्ट्रीय सदस्य डॉ. महेश कोपूलवार यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संवाद साधला. यावेळी किसान सभेचे राष्ट्रीय सदस्य डॉ. महेश कोपूलवार, जिल्हाध्यक्ष संतोष दास, राज्य महासचिव प्रा. नामदेव कन्नाके, राज्य सदस्य विनोद झोडगे, सुधाकर महाडोेरे प्रदीप बोबडे, गणेश हाके, प्रमोद गोडघाटे, कवडू येनप्रेड्डीवार, मिलिंद भन्नारे, रूद्राभाऊ कुचनकार आदी उपस्थित होतेचार दिवसात संघटनेची बैठक घेऊ- सुधीर मुनंटीवारजिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, प्रकल्पग्रस्त व असंघटीत कामगारांच्या मागण्यांची जाणीव आहे. या समस्यांचा तातडीने निपटारा करण्यासाठी येत्या चार दिवसांत महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक बोलावू. प्रलंबित समस्या सोडविण्यासोबतच कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी शासन सदैव कटीबद्ध आहे. प्रशासनाला तशा सूचना दिल्या आहेत, अशी ग्वाही मोर्चाच्या शिष्टमंडळ प्रमुखांशी भ्रमणध्वनीद्वारे बोलताना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.आदिवासी गावांना पेसा लागू करापोंभुर्णा : गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या वतीने सकाळी ११ वाजता डॉ. आंबेडकर चौकातून तहसील कार्यालयावर विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व जिल्हा अध्यक्ष मनोज आत्राम, गोंडवाना विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष धीरज शेडमाके, तालुका अध्यक्ष जगन येलके यांनी केले. शिष्टमंडळाने नायब तहसीलदार गिरीधर रणदिवे यांना समस्यांचे निवेदन दिले. ५० टक्के आदिवासी बहुल गावांना ५ व ६ व्या अनुसूचिअंतर्गत पेसा कायदा लागू करावा, पोंभुर्णा येथील इको पार्कला शहीद क्रांतीवीर बाबुराव शेडमाके यांचे नाव द्यावे, प्रत्येक गावात गोटूल उभारावे, तालुक्यातील शेतकºयांना सिंचनाची सुविधा द्यावी, जबरानजोत धारकांना पट्टे द्यावे, आदिवासी सुवर्ण जयंती शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांना द्यावी, शेतकºयांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी निवेदनातून केली आहे.संघरामगिरी रक्षणार्थ एकवटले बौद्धबांधवचिमूर : वन विभागाच्या विरोधात भन्ते ज्ञानज्योती महास्थविर व भिक्खु संघाच्या नेतृत्वात बौद्ध बांधवांनी मंगळवारी दुपारी १२.३० वाजता तक्षशिला बौद्ध विहारापासून उपविभागीय कार्यालयावर भव्य मुकमोर्चा काढला.तपोवन बुद्धविहार महाप्रज्ञा साधना भूमी संघारामगिरी (रामदेगी) येथे मागील ४५ वर्षांपासून बौद्ध धम्माचे प्रसार केंद्र्र बनले आहे. संघारामगिरी बौद्ध संस्कृतीची पावन भूमी असल्याने देश-विदेशातील हजारो अनुयायी दर्शन घेतात. मात्र ताडोबा बफर झोनमध्ये हे स्थळ येत असल्याच्या कारणावरून वन विभागाने नोटीस बजावली. धम्म समारोहाला परवानगी देण्यास टाळाटाळ व विहार परिसरातील साहित्य जप्त करण्याचा प्रयत्न अधिकाºयांनी केला. यामुळे भिक्खु संघ व नागरिकांत अंसतोष निर्माण झाला आहे. या घटनेच्या निषेधार्थ तक्षशिला बौद्ध विहार चिमूर येथून महामूक मोर्चाला सुरवात झाली. मोर्चा पंचशील चौक, चावडी मोहल्ला, मार्केट लाईन, शिवाजी चौक, शहीद बालाजी रायपूरकर चौक, नेहरू चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळामार्गे हा मोर्चा उपविभागीय कार्यालयावर धडकला. मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. सिक्कीमचे माजी राज्यपाल रा. सु. गवई यांच्या पत्नी डॉ. कमलाताई गवई, पिरिपाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे, माजी आमदार डॉ. अविनाश वारजूकर, भारिपचे कुशल मेश्राम, वनहक्क समितीचे अध्यक्ष रामकृष्ण वाघ आदींनी प्रशासनाचा निषेध केला. मागण्यांचे निवेदन एसडीओ बेहरे यांनी दिले. मोर्चात नागपूर, यवतमाळ, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, वर्धा जिल्ह्यातील हजारो धम्मबांधव सहभागी झाले होते.