शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्‍या विविध मागण्‍यांसाठी तहसीलवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:12 IST

तहसीलदारांना सादर केले निवेदन कोठारी : बल्‍लारपूर पंचायत समितीचे उपसभापती, भाजपा नेते सोमेश्‍वर पद्मगिरीवार यांनी सर्वसामान्‍य जनतेच्‍या, शेतकऱ्यांच्‍या जिव्‍हाळ्याच्‍या ...

तहसीलदारांना सादर केले निवेदन

कोठारी : बल्‍लारपूर पंचायत समितीचे उपसभापती, भाजपा नेते सोमेश्‍वर पद्मगिरीवार यांनी सर्वसामान्‍य जनतेच्‍या, शेतकऱ्यांच्‍या जिव्‍हाळ्याच्‍या मागण्‍यांकरिता कोठारी ते बल्‍लारपूर तहसील कार्यालयापर्यंत पायी चालत मोर्चा काढला व राज्‍य सरकारचा निषेध केला.

सर्वसामान्‍य नागरिकांच्‍या, शेतकऱ्यांच्‍या विविध मागण्‍यांचे निवेदन तहसीलदार यांना त्‍यांनी सादर केले.

शेतकरी कर्जमुक्‍ती योजनेंतर्गत नियमित कर्ज फेड करणाऱ्या थकीत नसलेल्‍या शेतकऱ्यांना प्रोत्‍साहन म्‍हणून ५० हजार रुपयांपर्यंत रक्‍कम देण्‍याचे शासनाने जाहीर केले होते, परंतु ही प्रोत्‍साहनपर रक्‍कम अद्याप शेतकऱ्यांना दिलेली नाही. सदर रक्‍कम त्‍वरित देण्‍यात यावी, कोरोनाचे कारण सांगत शबरी आवास योजना, रमाई आवास योजनेचे पैसे थकीत आहेत. ही रक्‍कम त्‍वरित देण्‍यात यावी, अवकाळी पावसामुळे झालेल्‍या नुकसानाची भरपाई एकरी २५ हजार रु. देण्‍याचे शासनाने जाहीर केले होते. ती रक्‍कम त्‍वरित देण्‍यात यावी, श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजना या योजनांच्‍या लाभार्थ्‍यांचे थकीत अनुदान त्‍वरित देण्‍यात यावे, भारनियमन त्‍वरित रद्द करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा आदी मागण्‍यांसाठी त्‍यांनी हा मोर्चा काढत तहसील कार्यालयाला धडक दिली.

या मोर्चाचे नेतृत्‍व सोमेश्‍वर पद्मगिरीवार यांनी केले. यावेळी भाजपाचे माजी जिल्‍हाध्‍यक्ष तथा नगराध्‍यक्ष हरीश शर्मा, भाजयुमो जिल्‍हाध्‍यक्ष आशिष देवतळे, सुनील फरकडे, विनायक कोसरे, श्‍यामराव जुनघरे, रूपेश पोडे, श्‍यामसुंदर झाडे, राजू रेनकुंटलवार, योगेश पोतराजे, गणपत मोरे, किसन उरकुडे, कल्‍पना देशमुख आदी उपस्थित होते.