शेतकऱ्यांत आनंद : पेरणी कामांना येणार वेगचंद्रपूर : गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा लागली होती. मृग नक्षत्राला सुरूवात होऊन तीन दिवसांचा कालावधी लोटत नाही तर बुधवारी जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी काही प्रमाणात सुखावला असून पेरणी कामांना आता वेग येणार आहे.रोहिणी नक्षत्र संपून मृग नक्षत्राला ८ जूनला सुरूवात झाली. यावर्षी चांगल्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्याने मृग नक्षत्रात पाऊस पडल्यास पेरणी करण्याचे अनेक शेतकऱ्यांनी नियोजन केले. बी-बियाणांची जुळवाजुळव, खताची खरेदी, मशागत पूर्व कामे यापूर्वीच पार पडली आणि पावसाच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. मात्र पाऊस झाला नाही. त्यामुळे यावर्षीसुध्दा पाऊस लांबणीवर जाणार का, हवामान खात्याचा अंदाज खोटा ठरणार का, अशी शेतकऱ्यांत चर्चा होती. मात्र बुधवारी जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी काही प्रमाणात समाधान व्यक्त केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)घुग्घुस, सावली येथे वादळी पाऊसघुग्घुस व सावली येथेही सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास जोरदार वादळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे अनेकांच्या घरांवरचे टिनाचे पत्रे उडाली. वादळामुळे वीज पुरवठा खंडीत झाल्याने येथील वीज पुरवठा पुर्णत: बंद झाला होता. नवरगाव येथे वादळाने अनेकांचे नुकसानबुधवारी सायंकाळी जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने नवरगाव येथील अनेक नागरिकांना फटका बसला. घरावरील टिनाचे पत्रे, कवेलू वादळामुळे उडाले. तर अनेक झाडेही उन्मळून पडली. त्यामुळे येथील वीज पुरवठा बंद झाला होता.वीज पडून दोन बैलांचा मृत्यूवीज पडून दोन बैलांचा मृत्यू झाल्याची घटना जिवती तालुक्यातील वणी खुर्द या गावात बुधवारी घडली. बुधवारी जिवती तालुक्यातही वादळी पावसाने हजेरी लावली.ंपावसाने मनपाची पोल खोलचंद्रपुरात बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. अचानक आलेल्या पावसाने मनपा प्रशासनाची पुन्हा एखादा पोल खोलली. मान्सूनपूर्व नाल्यांची साफसफाई केली जात असली तरी अनेक नाल्या कचऱ्याने तुंबल्या आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होऊन पाणी रस्त्यावरून वाहत होते. जयंत टॉकीज परिसरातील मुख्य मार्गावर पाणी साचल्याने वाहनधारकांना साचलेल्या पाण्यातून मार्ग काढावा लागला. तर अनेक ठिकाणी चिखल पसरला आहे.