शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात भन्तेजी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 14:17 IST

येथील रामदेगीनजिकच्या डोंगरावर असलेल्या संघरामगिरी या ठिकाणच्या विहार परिसरात ध्यानस्थ बसलेल्या भन्ते राहुल यांच्यावर मंगळवारी सकाळी बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली.

ठळक मुद्देसंघरामगिरी येथील विहार परिसरातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: येथील रामदेगीनजिकच्या डोंगरावर असलेल्या संघरामगिरी या ठिकाणच्या विहार परिसरात ध्यानस्थ बसलेल्या भन्ते राहुल यांच्यावर मंगळवारी सकाळी बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात भन्ते राहुल   चिमूर तालुक्यातील वन परिक्षेत्र बफर खडसंगी अंतर्गत येणाºया बौद्धधर्मियांचे श्रद्धा स्थान असलेल्या संघराम गिरी येथे साधना करीत असताना अचानक बिबट्याने हल्ला करून भन्ते राहुल बोधी याना ठार मारल्याची घटना आज सकाळी ११ वाजता दरम्यान घडली  ताडोबा अंधारी व्याग्र प्रकल्पाच्या हाकेवर असलेल्या बफर झोन कंपार्टमेंट क्रमांक ६० च्या हद्दीत मंगळवारच्या सकाळी ११ वाजत्या दरम्यान मागील काही दिवसांपासून संघराम गिरी येथे काही भन्ते अधिष्ठान करत असताना अचानक बिबट्याने हल्ला करून भन्ते राहुल बोधी यांच्या नरडीचा घोट घेतला.    सोबत अधिष्ठान करीत असलेल्या भन्तेला ही घटना दिसताच त्यांनी आरडा ओरड केली. मात्र तोपर्यंत बिबट्याने आपला डाव साधला होता          घटनेची माहिती मिळताच खडसंगी बफर झोनचे वन अधिकारी दुर्गेकार आपल्या सहकाºयांसह घटनास्थळी दाखल झाले व घटनेचा पंचनामा करीत आहेत.    काल झालेल्या घटनेची शाही वाळत नाही तोच २४ तासाच्या आत झालेल्या या हल्याने नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहेभन्तेजीवर झालेल्या हल्ल्याची माहिती परिसरात मिळताच अनेकांनी येथे धाव घेतली असून भन्तेजींच्या मृत्यूबाबत परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. विशेष उल्लेखनीय असे की, काल सोमवारी याच परिसरात बिबट्याने एका दुकानदारावर हल्ला चढवून त्याला ठार केले होते. 

टॅग्स :leopardबिबट्या