शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

देशातील अंतर्गत अर्थव्यवस्थेच्या सक्षमतेसाठी मुद्र्रा लोन योजना

By admin | Updated: September 20, 2016 00:38 IST

बुलतेदार आणि कारागिरांच्या कला उपजत असतात. त्यांना कला कुणी शिकवाव्या लागत नाहीत.

केंद्रीय वित्त राज्यमंत्री : अर्थसहाय्यात बँकांची टाळाटाळ नकोचंद्रपूर : बुलतेदार आणि कारागिरांच्या कला उपजत असतात. त्यांना कला कुणी शिकवाव्या लागत नाहीत. मात्र योग्य अर्थसहय्याअभावी ते व्यवसायात मागे पडतात. त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून देशाची अंतर्गत अर्थव्यवस्था सक्षम करण्ळासाठी पंतप्रधान मुद्रा योजना आहे. राष्ट्रीयकृत बँकांनी ही योजना प्रभावीपणे राबवावी, असे आवाहन केंद्रीय वित्त राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी केले आहे.स्थानिक चांदा क्लब मैदानावर सोमवारी रोजगार व स्वयं रोजगार संकल्प, राष्ट्रीयकृत बँका व विविध शासकीय संस्थांच्या सहकार्याने पंतप्रधान मुद्रा लोन योजनाचा लोन मेळावा व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर होते. प्रमुख पाहुणे राज्यसभा सदस्य डॉ. विकास महात्मे, महापौर राखी कंचलार्वार, आमदार नाना शामकुळे, आमदार अ‍ॅड. संजय धोटे, माजी मंत्री संजय देवतळे, महाराष्ट्र वन विकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, माजी आमदार जैनुद्दीन जवेरी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊनकर, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, विजय राऊत आदी मंचावर उपस्थित होते.यावेळी बोलताना ना. अर्जुनराम मेघवाल म्हणाले, देशात वित्तीय साक्षरता हळूहळू पुढे सरकत आहे. चंद्रपुरातील या मेळाव्यामुळे आपल्या वित्त विभागाचे काम सोपे झाले आहे, अशा शब्दात त्यांनी या मेळाव्याच्या यशस्वीतेचे कौतूक केले. ते पुढे म्हणाले, व्यवसायासाठी गरजुंना कर्ज देणाऱ्या बँकांचा सन्मान करा, कर्ज देण्यात टाळाटाळ करणाऱ्यांची दखल घ्या. गरीब माणसे कर्ज वेळेवर फेडतात, याची हमी पंतप्रधानांनी घेतली आहे. त्यामुळे पारंपारिक व्यावसायिकांना कर्ज देताना जामीनदाराची गरज भासणार नाही.या योजनेअंतर्गत देशात आजवर पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या एक कोटी १६ लाख लोकांना ४५ हजार ५१४ कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. पंतप्रधान मुद्रा लोन योजनेत कृषी कर्जाचा समावेश करण्यात आला असून भविष्यात शहरी जनतेलाही सहभागी केले जाईल.अध्यक्षीय भाषणात केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही महत्वकांशी योजना आहे. सर्वसामान्य, कष्टकारी जनतेची गरज ओळखून ही योजना सुरू केली आहे. योजनेचा लाभ पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या सर्व जनतेला व्हावा असे त्यांचे स्वप्न आहे. अधिकाधिक गरजुंना बॅकांच्या सहाय्याने कर्ज मंजूर करुन त्याची पुर्तता करा, असे आवाहन त्यांनी केले. जिल्हातील २४ बँकांनी सहा हजार ४९१ गरजु लाभार्थ्यांना कर्ज उपलब्ध करून दिले. त्यात चार हजार ३३४ शिशु लोन, एक हजार ७७८ लोकांना किशोर लोन तर ३७८ लोकांना तरूण लोन दिल्याची माहिती त्यांनी दिली.प्रारंभी दोन्ही मंत्र्यांच्या हस्ते पारंपारिक व्यवसायिकांना कर्जाचे धनादेश वितरित करण्यात आहे. खा. विकास महात्मे व महापौर राखी कंचलार्वार यांचीे समयोचीत भाषणे झालीत.मेळाव्यात विविध राष्ट्रीयकृत २४ बँकांनी स्टॉल लावले होते. पारंपारिक व्यावसायीकांकडून येथे अर्ज भरुन घेण्यात आले. विविध बॅकांच्या अधिकाऱ्यांनी कर्ज घेण्यासाठी उपस्थितांना मार्गदर्शन केले.प्रस्ताविक आ. नाना शामकुळे यांनी केले, तर आभार राजेश मुन यांनी मानले. संचालन नासीर खान यांनी केले. पारंपारिक व्यवसायिक कारागिर, सर्वसामान्य नागरिक व विद्यार्थी महिला व्यवसायिकांची लक्षणिय उपस्थिती होती. (जिल्हा प्रतिनिधी)