शहरं
Join us  
Trending Stories
1
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
2
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
3
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राम्होस क्षेपणास्त्र डागणार...
4
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
5
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
6
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
7
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
8
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
9
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर
10
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
11
हसतं घर उद्ध्वस्त! हळदीच्या दिवशी नाचताना नवरी बेशुद्ध अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले
13
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
14
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा
15
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
16
LIC नं मार्च तिमाहीत खरेदी केले ₹४७,००० कोटी रुपयांचे शेअर्स; 'या' स्टॉक्समध्ये मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
17
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
18
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
19
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
20
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा

कचरा संकलनासाठी मोजावे लागणार पैसे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 22:54 IST

लोकवर्गणीतून कचरा संकलनाचा खर्च वसूल करण्यात यावा, असा निर्णय राज्य शासनाने घेतल्याने आता कचरा संकलनासाठी राज्यातील न. प. क्षेत्रातील नागरिकांना दर महिन्याला पैसे मोजावे लागणार आहे.

ठळक मुद्देदंड आकारणीवर गुण : चार स्टार व सात स्टारसाठी भद्रावती न. प.चा प्रयत्न

सचिन सरपटवार ।लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : लोकवर्गणीतून कचरा संकलनाचा खर्च वसूल करण्यात यावा, असा निर्णय राज्य शासनाने घेतल्याने आता कचरा संकलनासाठी राज्यातील न. प. क्षेत्रातील नागरिकांना दर महिन्याला पैसे मोजावे लागणार आहे.घरे व आस्थापनामधून कचरा संकलन करण्यासाठी शुल्क आकारण्यात आले आहे. अ व ब वर्गातील नगरपालिकांमध्ये दरमहा घरगुती ४० रूपये, दुकाने ६० रूपये, शोरूम, गोदामे उपहारगृहे व हॉटेल ८० रूपये, राहण्याची व जेवणाची व्यवस्था असणारी हॉटेल १०० रूपये, पन्नास खाटांपेक्षा कमी रूग्णालये ८० रूपये, पन्नास खाटांपेक्षा जास्त रूग्णालये १२० रूपये तसेच शैक्षणिक धार्मिक संस्था व शासकीय निमशासकीय कार्यालयांसाठी ६० रूपये असे शुल्क आकारण्यात आले आहे. उपरोक्त दर हे दरवर्षी पाच टक्क्याने वाढविण्यात येणार आहे.स्वच्छ सर्वेक्षण २०१९ साठी केंद्रामार्फत तपासणी सुरू असून भद्रावती शहरात ३१ जानेवारीपर्यंत केव्हाही तपासणी होण्याची शक्यता आहे. स्वच्छ सर्वेक्षण, कचरामुक्त शहर व हागणदारी मुक्त शहराचा दर्जा यातीलही योजनांची तपासणी वेगवेगळ्या पद्धतीने करण्यात येणार आहे.केंद्र तपासणी चमुद्वारे नागरिकांना सात प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. त्यासाठी न. प. भद्रावतीने आपले अनुभव व मत मांडण्याकरिता ९७६४००९९७७ या क्रमांकावर डायल करून हॅलो स्वच्छतेला प्रतिसाद द्यावा असे आवाहन भद्रावती न. प. द्वारे नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी केले आहे. तसेच स्वच्छतेची तक्रार नोंदविणे अगदी सुलभ झाले असून निशुल्क स्वच्छ अ‍ॅप डाऊनलोड करावा, असे आवाहनही नागरिकांना करण्यात आले आहे.चार स्टार तारांकित मानांकन दर्जा यासाठी भद्रावती न. प. चा प्रस्ताव शासनाकडे केला असून दोन स्टार यापूर्वीच प्रमाणित करण्यात आले आहे.तीन स्टारसाठी केंद्रीय चमू भद्रावती येथे येणार आहे. कचरा संकलन लोकवर्गणीतून जमा झालेली रक्कम, प्लॉस्टिकबंदीबाबत जनजागृती, बंदीसाठी केलेली कारवाई व दंड, घराच्या बाहेर रस्त्यावर फेकलेला कचरा व त्यावरची दंड आकारणी याला मार्कस देण्यात येणार आहे.या सोबतच घराघरातून १०० टक्के कचरा संकलन, ओला व सुका कचऱ्याचे घरातूनच १०० टक्के वर्गीकरण व १०० टक्के कचºयावर प्रक्रिया व शौचालये तसेच शहराचा स्वच्छता याबाबत नागरिकांचे सहकार्य अपेक्षित असल्याची माहिती न. प.भद्रावतीद्वारे देण्यात आली आहे. प्रत्येक मालमत्ताधारकाच्या घरी स्टिकर लावण्यात येत असून त्यावर एक नंबर देण्यात येवून त्याचे छायांचित्र घेवून न. प. ला पाठवण्यिात येत आहे.न. प. द्वारे एकलाख ३६ हजार दंड वसूलमागील सहा महिन्यात भद्रावती न. प. द्वारे प्लास्टिक वापराबाबतचा एक लाख ३६ हजाराचा दंड वसूल करण्यात आला असून याबाबत मोठ्या प्रमाणात कारवाई चालु आहे. यासोबतच उघड्यावर शौच करण्यासाठी ११०० रूपये, डस्टबीन न वापरणे, स्वच्छतेचा दंड २२०० सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करण्यासाठी २०० रूपये दंड व सार्वजनिक ठिकाणी थुंकणे याबाबत २०० रूपये इतका दंड आकरण्यात आला आहे.भद्रावती न. प. ला चार स्टार व सात स्टार मिळाल्यास शहराचे नावलौकिक होईल. विविध लोक शहराला भेटी देतील. स्वच्छ व सुंदर भद्रावतीसाठी शासनाकडून मोठा निधीसुद्धा मिळेल. यासाठी स्वत:च्या घरासारखे शहरसुद्धा स्वच्छ ठेवावे. सोबतच शाळा, महाविद्यालये, दवाखाने, धार्मिक संस्था, व्यापारी प्रतिष्ठाने यांनीसुद्धा परिसर स्वच्छ ठेवून सहकार्य करावे. चालू वर्षाची घर टॅक्स पावती दाखवून स्वच्छतेची माहिती देणारे २०१९ चे कॅलेंडर न. प. मधून नागरिकांनी घेवून जावे.-अनिल धानोरकर,नगराध्यक्ष न. नप. भद्रावती