शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

भटाळा खदानीत महिला कामगाराचा दरड कोसळल्याने मृत्यू ?

By admin | Updated: May 19, 2016 00:41 IST

तालुक्यातील भटाळा गावाच्या परिसरात पांढऱ्या दगडाच्या मोठ्या प्रमाणात खदानी आहेत.

तक्रार नाही : प्रकरण दडपले जाण्याची शक्यतावरोरा : तालुक्यातील भटाळा गावाच्या परिसरात पांढऱ्या दगडाच्या मोठ्या प्रमाणात खदानी आहेत. यामध्ये अनेक खदानीमध्ये उत्खनन करण्याची परवानगी नसल्याचे समजते. अशाच एका खदानीत परप्रांतीय महिलेचा काम करताना दरड कोसळल्याने मृत्यू झाल्याची चर्चा परिसरात केली जात आहे. या प्रकरणाची तक्रार कुठेही करण्यात आली नाही. त्यामुळे सदर प्रकरण दडपले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.वरोरा तालुक्यातील भटाळा गावाच्या परिसरातील टेकड्यामध्ये उच्च प्रतिचा पांढरा दगड आहे. मागील कित्येक वर्षापासून यामधील दगड काढून गिट्टी तयार करून मोठ्या प्रमाणात व्यवसाय केला जात आहे. दगड काढत असताना या परिसरात मोठे खड्डे पडले आहेत. यामध्ये अनेकदा अपघात झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. भटाळा परिसरातील अनेक खदानीमध्ये उत्खनन करण्याची परवानगी नसल्याची माहिती समोर आली आहे. १७ मे रोजी भटाळा परिसरात खदानीमध्ये उत्खनन करण्याचे काम काही परप्रांतीय मजूर करीत होते. त्यावेळी खदानीची दरड कोसळल्याने सकाळी एक महिला मजूर गंभीर जखमी झाली. या जखमी महिलेस रुग्णालयात नेत असताना तिचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्यानंतर त्याच वाहनाने मृताच्या कुटुंबीयास काही रोख रक्कम देवून मूळ राहत असलेल्या राज्यात परत पाठविल्याचे समजते. या प्रकरणी शहानिशा करण्याकरिता प्रशासनाकडे विचारणा केली असता कुठेही नोंद आढळून आली नाही. खदानीचा मालक स्थानिक असल्याने ग्रामस्थ प्रकरणाची वाच्चता गावात करीत नसल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी प्रशासनाने केल्यास खदान अवैध की वैध, मृताच्या कुटुंबियांना किती मदत देण्यात आली, आदी बाबी समोर येईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)