शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

थॅलेसेमिया रुग्णांना मिळणार आधुनिक सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 23:39 IST

जिल्ह्यातील थॅलेसेमिया रुग्णांना आधुनिक आरोग्य सुविधा मिळावी, यासासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे, ....

ठळक मुद्देएस. एस. मोरे : थॅलेसेमिया दिनानिमित्त जागृती शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: जिल्ह्यातील थॅलेसेमिया रुग्णांना आधुनिक आरोग्य सुविधा मिळावी, यासासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे, असे मत वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांनी केले. वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय आणि थॅलेसेमिया बहुउद्देशिय कल्याणकरी संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या थॅलेसेमिया दिनानिमित्त कार्यक्रमात ते अध्यक्ष म्हणून बोलत होते.थॅलेसेमियाग्रस्त रुग्णासाठी चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक अकराचया बाजूला सुसज्य असे थॅलेसेमिया डे केअर सेंटर येत्या काही दिवसांत सुरू होणार आहे. थिंक फाऊंडेशनचे उपाध्यक्ष विनय शेट्टी, जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. मुनघाटे, अध्यक्ष सुरेश आत्राम, महेश एस. पानसे, उपाध्यक्ष भास्कर शेंडे यांच्यासोबत थॅलेसेमिया डे केअर सेंटरच्या सभागृहाची पाहणी करण्यात आली. सुसज्ज करण्याकरिता थिंक फाऊंडेशन मुंबई व महेंद्रा अ‍ॅण्ड महेंद्राच्या कंपनीने आर्थिक सहाय्य केले. थॅलेसेमिया बहुउद्देशिय कल्याणकारी संस्थेच्या देखरेखीखाली हे काम पूर्ण झाले. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस.एस. मोरे यांचे अध्यक्षीय भाषण झाले. डॉ. मोरे यांनी थॅलेसेमियाग्रस्त बालकांसाठी वैद्यकीय सेवा चांगल्या कशा देता येईल, याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. डॉ. मुनघाटे यांनी विनय शेट्टी, थिंक फाऊंडेशनचे उपाध्यक्ष व डॉ. विक्री रुग्वानी, डॉ. मंगेश गुलवाडे, डॉ. गांधी, डॉ. सूर्यवंशी आदींनीही विचार मांडले. यावेळी थॅलेसेमिया बहुउद्देशिय कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष सुरेश आत्राम, सचिव महेश पानसे, उपाध्यक्ष भास्कर शेंडे, कोषाध्यक्ष छाया आत्राम तसेच पदाधिकारी राजेंद्र रणदिवे कायदे सल्लागार अ‍ॅड. श्रीकांत खोंड, सार्वे निकुरे, भक्ते, सुधीर पोटे आदी उपस्थित होते.