शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

गावच्या ‘मॅडम’ला शिकविणार मोबाईल

By admin | Updated: September 25, 2016 01:20 IST

अनेक उच्च शिक्षित महिलांकडे मोबाईल असला तरी तो अनामिक भीतीपायी पर्समध्येच असतो.

शिक्षण विभागाचा सुधारणावाद : शिक्षकांसाठी कार्यशाळाराकेश बोरकुंडवार  सिंदेवाहीअनेक उच्च शिक्षित महिलांकडे मोबाईल असला तरी तो अनामिक भीतीपायी पर्समध्येच असतो. त्यामुळे त्याचा वापर फारच कमी होतो. मात्र, जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना हा भित्रेपणा परवडणारा नाही. अध्यापनात आता मोबाईलचा वापर वाढतोय. परिणामी शिक्षण विभाग गावोगावच्या शिक्षकांना चक्क मोबाईल वापराचे प्रशिक्षण देणार आहे.तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जशी झपाट्याने क्रांती होत आहे, तसाच शिक्षण क्षेत्रातही बदल होत आहे. किंबहुना तंत्रज्ञान आणि शिक्षण हातात हात घालून पुढे झेपावत आहे. शासनाच्या ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’, या अभियानात तर तंत्रज्ञानाशिवाय पर्यायच नाही. अध्यापन करताना पारंपारिक खडू-फळ्यासोबतच व्हाईट बोर्ड, संगणक, लॅपटॉप अशा आधुनिक साधनांचा वापर होत आहे. त्यातल्या त्यात कमी खर्चात शाळा डिजिटल करताना मोबाईल अत्यंत महत्त्वाचा ठरला. मात्र ग्रामीण भागात अध्यापन करणाऱ्या अनेक शिक्षकांना अद्यापही अ‍ॅण्ड्राईड मोबाईल निट हाताळता येत नाही. त्यामुळे नव्या अध्यापन पद्धतीत त्यांना अवघडलेपणा जाणवतो. जि.प. शाळांमध्ये काम करणाऱ्या शेकडो शिक्षिका मोबाईल बाळगतात. मात्र केवळ ‘मी शाळेतून निघाले, मी अर्धा तासात घरी पोहोचते’, एवढे सांगण्यापुरता मोबाईल वापरला जातो.अ‍ॅण्ड्राईड मोबाईलमधील कित्येक उपयुक्त फॅक्शन अजूनही त्यांना वापरता येत नाही. उत्तम अध्यापन कौशल्य असूनही प्रत्यक्ष वर्गात त्याचा वापर होत नाही. ही स्थिती दूर करण्यासाठी शिक्षण विभागाने शिक्षिकांना प्रशिक्षण देण्याचा विचार घेतला असल्याचे सांगण्यात येते. प्रत्येक पंचायत समिती स्तरावर ही प्रशिक्षण कार्यशाळा दिवाळीनंतर होण्याचे संकेत आहे. कार्यशाळेमध्ये प्रत्येक महिला शिक्षिकेला स्वत:चा मोबाईल आणि त्यात नेट पॅक टाकुन उपस्थित राहावे लागणार आहे. महिला शिक्षिकांना प्रशिक्षित करण्यासाठी प्रशिक्षिक करण्यासाठी प्रामुख्याने तंत्रस्नेही शिक्षकांना प्राधान्य देण्यात आले आहे. (शहर प्रतिनिधी)