शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

शौचालयांपेक्षा मोबाईलची संख्या अधिक

By admin | Updated: April 8, 2015 00:04 IST

एकीकडे भारत स्वच्छ करण्यासाठी केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छतेवर भर दिला आहे. यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे....

अभियानाचा फज्जा : शौचालयात ठेवली शेतीची अवजारेचंद्रपूर : एकीकडे भारत स्वच्छ करण्यासाठी केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छतेवर भर दिला आहे. यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. विविध योजनांतर्गत जनतेला स्वच्छतेचे महत्व पटवून दिले जात आहेत. दुसरीकडे ग्रामीण जनता यापासून अनभिज्ञ आहे. आजही ग्रामीण भागात राहणाऱ्या कुटूंबामध्ये शौचालयाला महत्व कमी प्रमाणात आहे. मात्र मोबाईल फोन प्रत्येक कुटूंबात आढळतो. हातात झाडू घेवून प्रधानमंत्री यांनी जनतेला स्वच्छतेचा मंत्र दिला आहे. मात्र प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे शासकीय योजना ग्रामीण भागात पोहचत नाहीत. परिणामी या भागात राहणारी गरीब जनता स्वच्छतेच्या योजनेपासून कोसो दूर आहेत. ज्या प्रमाणात विज्ञान युगात प्रत्येक कुटुंबात मोबाईल फोन असणे गरजेचे आहे. त्याप्रमाणे प्रत्येक कुटुंबाकडे शौचालय असणे अती महत्वाचे आहे. स्वच्छतेकडून समृध्दीकडे घेऊन जाण्यासाठी राज्यात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले आहे. या अभियानाला ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळाला. सन २०१३ पासून हागणदारी मुक्त संकल्पना पुढे आली. ग्रामीण परिसरातील बऱ्याच गावातील कुटुंंबामध्ये शौचालय नसल्याने निर्मलग्राम योजनेच्या माध्यमातून गावागावांत शौचालय बांधण्यात आले. शौचालयाचा वापर वाढल्यामुळे गावात स्वच्छता पाहायला मिळत होती. १२ निकषाच्या आधारावर निर्मल गावांची निवड करण्यात आली. अशा गावांना राष्ट्रपतीच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते. निर्मलग्राम झालेल्या गावांना विशेष निधी दिला गेला. मात्र निर्मलग्राम निधी मिळालेल्या गावांना, प्रशासनाला स्वच्छता टिकवून ठेवण्यासाठी पाहिजे त्या प्रमाणात यश आले नाही. त्याचा अनपेक्षीत परिणाम झाल्याचे प्रत्येक कुटुंबाकडे शौचालय असावे, शौचालयाचा वापर नियमीत करावा म्हणून शासनाकडून जनजागृती केली जात आहे. मात्र जनता याकडे दुर्लक्ष करीत आहे. अनेकांनी शौचालय बांधलेले असले तरी, त्याचा वापर न करता त्यात शेतीची अवजारे ठेवली जात आहे. गावाच्या मुख्य मार्गाच्या कडेलाच ग्रामस्थ पहाटेच शौचास बसतात. गावाच्या वेशीवर नागरिक शौचास बसत असल्याने त्याच्या दुर्गंधीवरूनच गाव आल्याची माहिती कळते. घरी शौचालय असून सुध्दा नागरिक शौचालयाचा वापर न करता रस्त्यावर शौचालयाकरिता जातात. मोबाईल व शौचालयाची मोजणी केल्यास मोबाईल फोन जास्त आढळून येतात. उघड्यावर शौचास जाणाऱ्यांवर शासनाने दंडात्मक कारवाई करण्याचा अध्यादेश काढला असला, तरी तो कायदा अजूनही कागदावरच असल्याने योजनेचा फज्जा उडाला आहे. (प्रतिनिधी)प्रशासन उदासीनएखादी नवी योजना आल्यास तिचा गवगवा केला जातो. वास्तवीक मात्र त्यासाठी ग्रामीण भागांत जाऊन मेहनत केली जात नाही. परिणामी ग्रामीण भागांत या योजना पोहचत नाही. अशात ग्रामीण भागातील जनता या योजनांपासून वंचीत राहते. प्रशासनाची उदासिनता ग्रामीणांसाठी तोट्याचे ठरते.